Search
Close this search box.

चादर, बॅग, पोती….जिथे दिसेल तिथे नुसतं सोनं; छापा टाकल्यानंतर पोलीस हादरले; चोरांनी अख्खं शोरुम केलं होतं रिकामी

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

राजधानी दिल्लीत रविवारी चोरट्यांनी अख्खं ज्वेलरी शोरुम लुटल्याने खळबळ उडाली होती. चोरांनी तब्बल 25 कोटींचं सोनं लुटलं होतं. दरम्यान पोलिसांनी या चोरीच्य गुन्ह्याचा उलगडा करण्यात यश आलं आहे. पोलिसांनी छत्तीसगडमधून तीन चोरांना अटक केली आहे. त्यांच्याकडे चोरी केलेलं सोनंही सापडलं आहे. अटक केलेल्यांमध्ये मास्टरमाइंडचाही समावेश आहे.

पोलिसांच्या चोरांच्या ठिकाणावर छापा मारला असताना चादरीवर पसरुन ठेवलेलं सोनं पाहून हादरले. कारण चादरीवर तब्बल 18 किलोहून अधिक सोनं ठेवण्यात आलं होतं. पोलीस छापा मारण्यासाठी पोहोचले असता चादर, बॅग आणि पोत्यांमध्ये सोनं लपवून ठेवण्यात आलं होतं.

बिलासपूर पोलिसांच्या एसीसीयू आणि सिव्हिल लाइन स्टेशनच्या पथकाने सात चोरींमध्ये सहभागी असलेल्या लोकेश श्रीवासला बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांना त्याच्याकडे दिल्लीमधील शोरुममधून लुटण्यात आलेलं 18 किलो सोनं सापडलं आहे. याशिवाय पोलिसांनी आरोपींकडून वेगवेगळ्या चोरींमधून लुटलेली 12 लाख 50 हजारांची रोख रक्कम जप्त केली आहे.

admin
Author: admin

और पढ़ें