Search
Close this search box.

आमदार प्रताप सरनाईक यांची 7 कोटी 66 लाखांची फसवणूक; पोलिसांत गुन्हा दाखल

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

आमदार प्रताप सरनाईक यांची 7 कोटी 66 लाखांची फसवणूक करणाऱ्या व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जमिनीचा व्यवहार करण्यासाठी सरनाईक यांच्याकडून आरोपीनं पैसे घेतले होते. मात्र जमिनीचा व्यवहार पूर्ण न करता पैसेही परत दिले नसल्याचा सरनाईक यांनी आरोप केला आहे. 2021 पासून आतापर्यंतच्या काळात ही फसवणूक झाली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

काशीमीरा पोलिसांनी मालाडमधील मार्टिन अॅलेक्स बर्नार्ड कोरिया या आरोपीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

घोडबंदर रोडवरील एक जमीन सरनाईक यांना घ्यायची होती. त्यासाठी या जमिनीचा व्यवहार होता होता. मात्र आरोपीने फसवणूक केली आहे.

सरनाईक यांच्यासोबतच्या व्यक्तीनं तक्रार केल्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बँकेचे हप्तेही आरोपीने भरले नसल्याचं समोर आलं आहे.

प्रताप सरनाईक यांनी आर्थिक गुन्हे शाखेकडेही संबंधित व्यक्तीची तक्रार दाखल केली आहे.

admin
Author: admin

और पढ़ें