Search
Close this search box.

दिल्ली हादरली! Girlfriend ची छेड काढणाऱ्यांचा विरोध करणाऱ्या 19 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

दिल्ली विद्यापीठाच्या साऊथ कॅम्पसमध्ये शनिवारी रात्री एक धक्कादायक घटना घडली आहे. शाब्दिक वादानंतर लेक्चरसाठी आलेल्या दोन विद्यार्थ्यांमध्ये बाचाबाची झाली. यानंतर एका विद्यार्थ्याची चाकू भोसकून हत्या करण्यात आली. प्राथमिक माहितीनुसार हत्या करण्यात आलेला तरुण 19 वर्षांचा आहे. या मुलाच्या गर्लफ्रेण्डची काही जणांनी छेड काढली असता याच मुद्द्यावरुन वाद झाला. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चौघांना अटक केली आहे. मरण पावलेल्या मुलाचं नावं निखील चौहान असं आहे. निखिल हा दिल्लीमधील पश्चिम विहारचा रहिवाशी होता.

नेमकं कारण काय?
दिल्ली विद्यापीठ परिसरात असलेल्या आर्यभट्ट कॉलेजच्या गेटवर रविवारी सायंकाळच्या सुमारास हा संपू्र्ण प्रकार घडला. मुक्त अभ्यासक्रमाअंतर्गत दाखल घेतलेला निखील लेक्चरसाठी या ठिकाणी आला होता. निखीलवर हल्ला करणाऱ्या तरुणांबरोबर त्याचा आठवडाभरापूर्वी वाद झाला होता. गर्लफ्रेण्डची छेड काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या टवाळखोरांना निखीलने विरोध केला होता. त्यावेळेस प्रकरण बाचबाचीवर संपलं. मात्र सात दिवसांनी या तरुणांनी निखिलला निर्जनस्थळी एकटं गाठून त्याच्यावर प्राणघातक हल्ला केला.

मृत घोषित केलं
जखमी अवस्थेत निखीलला मोती बाग येथील चरक पालिका रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. मात्र त्याला दाखल करुन घेण्यापूर्वीच मृत घोषित करण्यात आलं. निखील हा पॉलिटीकल सायन्सचा पहिल्या वर्षाचा रहिवाशी होता.

पोलिसांची टीम स्थापन
या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपींची ओळख पटल्यानंतर सीसीटीव्ही कॅमेरांमधील फुटेजच्या आधारे काही जणांना अटक करण्यात आली आहे. घटनाक्रम घडला त्या ठिकाणाची पहाणी करुन नेमकं काय काय आणि कसं घडलं असेल याचा अंदाज पोलिस बांधत आहेत. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी स्वतंत्र टीम स्थापन करण्यात आली आहे.

मृतदेह नातेवाईकांना सोपवला
निखीलचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेऊन शवविच्छेदनानंतर तो नातेवाईखांना सोपवण्यात आला. दिल्ली विद्यापीठाने घडलेला हा प्रकार फार दुर्दैवी असल्याचं म्हटलं आहे. ज्या ठिकाणी मुलं शिकायला आणि त्यांचं करिअर बनवायला येतात त्याच कॉलेजच्या गेटवर घडलेल्या या प्रकरणामध्ये एका मुलाने जीव गमावला हे फारच खेदजनक आहे. “विद्यार्थ्याचा जीव गेल्याने आम्ही फार दु:खी आहोत. देव त्याच्या आत्म्यास शांती देवो. त्याच्या कुटुंबियांना हा आघात सहन करण्याची शक्ती मिळो,” असं विद्यापीठाने जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.

admin
Author: admin

और पढ़ें

अमरावतीच्या परतवाडा येथील लैंगिक शोषण, व्हिडीओ व्हायरल (Amravati Paratwada Case)आणि ब्लॅकमेलिंग प्रकरणातील मुख्य आरोपी अयान अहमद याच्याबाबत अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. अयानने आपल्या चैनीसाठी स्वतःच्या आईचे मंगळसूत्र आणि सोन्याचा हार चोरून (Amravati Paratwada Case) विकला होता, अशी माहिती समोर आली आहे. त्याच्या सोशल मीडिया रिल्समधे जे नोटांचे बंडल दिसायचे, ते प्रत्यक्षात आईचे दागिने विकून मिळालेले पैसे होते. अयानला महागड्या हॉटेल्समध्ये जाणे, मुलींवर पैसे खर्च करणे आणि महागडे मोबाईल वापरणे अशा विलासी सवयी होत्या, त्यासाठी त्याने आपल्या आईचे दागिने चोरल्याचं आणि विकल्याचं समोर आलं आहे.(Amravati Paratwada Case) Amravati Video Viral : पैशासाठी स्वतःच्या आईचे मंगळसूत्र आणि सोन्याचा… अमरावतीच्या परतवाडामध्ये तरुणींचे लैंगिक शोषण आणि अश्लील व्हिडिओ व्हायरल केल्याच्या प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. या प्रकरणातील मुख्य आरोपी अयानचा (Amravati Paratwada Case) भयान चेहरा आता समोर आला आहे. पैशासाठी स्वतःच्या आईचे मंगळसूत्र आणि सोन्याचा एक हार चोरून विकला होता. अयानच्या रिल्स मध्ये असलेले नोटांचे बंडल आईचं मंगळसूत्र चोरून विकून मिळालेल्या पैशाचे होते अशी माहिती समोर आली आहे. हॉटेलमध्ये जाणे, मुलींवर पैसे खर्च करणे आणि महागडे मोबाईल वापरणे यांचा अयानला छंद होता. यातूनच तो कर्जबाजारी झाला आणि मग त्याने आईचं मंगळसूत्र ही चोरून विकलं अशी माहिती समोर आली आहे.(Amravati Paratwada Case) Amravati Video Viral : आयनचा थार अन् चार iPhone चा व्हिडीओ व्हायरल, ती कार कोणाची? अमरावतीच्या परतवाडा प्रकरणातील मुख्य आरोपी अयान अहमद याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे, त्यामध्ये तो ‘थार’  (Thar) कारमध्ये बसलेला आहे, त्याच्याकडे चार आयफोन आहेत, हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता ती गाडी कोणाची? गाडीचे मालक कोण आहेत? आणि त्या व्हिडिओमागील सत्य काय आहे?, याची माहिती समोर आली आहे.(Amravati Paratwada Case) अयान ज्या काळ्या रंगाच्या थार गाडीत (MH 27 DL 3111) व्हिडिओ बनवताना दिसला, ती गाडी परतवाडा येथील राजेश रोशनलाल प्रजापती यांच्या मालकीची आहे. राजेश प्रजापती यांचे तिथे ‘संजय ऑटो पार्ट्स’ नावाचे दुकान आहे. राजेश प्रजापती यांचा मुलगा आर्यन प्रजापती याने दिलेल्या माहितीनुसार, त्याची आणि अयानची ओळख OLX वरून झाली होती. आर्यनला अयानकडून एक मोबाईल घ्यायचा होता, त्या संदर्भात त्यांची भेट झाली होती. अयानने आर्यनला सांगितले की तो एक ‘रील क्रिएटर’ असून त्याचे १८,००० फॉलोअर्स आहेत. त्याने आर्यनला विनंती केली की त्याला गाडीसोबत एक व्हिडिओ बनवायचा आहे. ओळखीच्या नात्याने आर्यनने त्याला गाडीत व्हिडिओ बनवू दिला. तर अयानच्या रीलमध्ये दिसणारी बंदूक ही शिकारीची किंवा खरी बंदूक नसून ती शेतात जनावरांना पळवण्यासाठी वापरली जाणारी ‘एअर गन’ (Air Gun) असल्याचा दावा आर्यनने केला आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी राजेश आणि आर्यन प्रजापती यांना पोलीस ठाण्यात बोलावून त्यांची चौकशी केली आणि त्यांचे जबाब नोंदवून घेतले आहेत.