आधार कार्ड (Aadhar card ) नसणाऱ्यांना उपचार नाकारल्यास कारवाई केली जाणार आहे. मुंबई महापालिकेने आरोग्य अधिकाऱ्यांना तसा इशारा दिला आहे. नुकताच राजावाडी रुग्णालयात एका गर्भवतीकडे नवऱ्याचे आधारकार्ड नसल्याने उपचार नाकरल्याची घटना घडली. या घटनेनंतर अनेक सामाजीक आणि रुग्णमित्र संस्थांनी याबाबत तक्रार करत विरोध केला. मुंबई महानगरपालिकेने आरोग्य विभागाला आधारकार्ड नसल्यास कोणत्याही गर्भवतीला आरोग्य सुविधा न देता परत पाठवू नका, असे आदेश दिले आहेत.









