Search
Close this search box.

कोल्हापुरात ठिय्या आंदोलनाला हिंसक वळण, कोल्हापूर परिक्षेत्राचे आयजी थेट रस्त्यावर; परिस्थितीवर तातडीने नियंत्रण आणण्याचे गृहखात्याचे निर्देश

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

कोल्हापुरात शिवराज्याभिषेक दिनी आक्षेपार्ह स्टेट्स ठेवण्यात आल्याच्या निषेधार्थ कोल्हापूरमध्ये हिंदुत्ववादी संघटना आज (7 जून) रस्त्यावर उतरल्या आहेत. संघटनांच्या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने राज्याच्या गृहविभागाकडून कोल्हापूर पोलिसांना तातडीने शहरातील परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी गृह खात्याला निर्देश दिले आहेत. दुसरीकडे, कोल्हापूरचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आक्षेपार्ह स्टेटस ठेवणाऱ्या सहा जणांना अटक करण्यात आल्याची माहिती दिली आहे. तसेच परिस्थितीचा आढावा घेत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

कोल्हापूरमध्ये परिस्थिती नियंत्रण आणण्यासाठी कोल्हापूर पोलीस दल रस्त्यावर आहे. कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी स्वत: शिवाजी चौकात रस्त्यावर उतरले आहेत. दुसरीकडे, आज सकाळी दहा वाजता कोल्हापुरातील हिंदुत्ववादी संघटना छत्रपती शिवाजी महाराज चौकात जमल्या. पोलिसांकडून ठिय्या आंदोलन करण्याचे आवाहन करण्यात आले होते. मात्र, संघटना रॅली काढण्यावर ठाम होत्या. पोलिसांनी विरोध रॅलीला परवानगी दिली नाही. यानंतर पोलीस आणि संघटनांमध्ये बाचाबाची झाली. सकाळी साडेअकराच्या सुमारास ठिय्या आंदोलनाला हिंसक वळण लागले. त्यामुळे शिवाजी चौक परिसराला लागून असलेल्या भागात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. यावेळी जमावाला पांगवण्यासाठी बळाचा वापर करावा लागला. पोलिसांनी सौम्य लाठीमार करत जमावाला परिस्थिती नियंत्रणात आणली. यावेळी रस्त्यावर चपलांचा ढीग पडला होता.

साडेबाराच्या सुमारास पुन्हा हिंसक वळण
दरम्यान, पोलिसांनी शिवाजी चौकातील परिस्थिती नियंत्रणात आणल्यानंतर दुपारी साडेबाराच्या सुमारास परिस्थिती नियंत्रणात होती. मात्र, मनपा शिवाजी चौक भागातील बहुंताश भाग चिंचोळ्या रस्त्यांचा आहे. त्यामुळे या भागात दबा धरुन बसलेला जमाव पुन्हा रस्त्यावर आला. त्यामुळे पोलिसांना अश्रूधुराचा वापर करावा लागला. पोलिसांनी आक्रमक पवित्रा घेत जमावाला लाठीचा प्रसाद देऊन पांगवलं. शहरातील पान लाईन, महाद्वार रोड, माळकर तिकटी, बारा इमाम परिसर, शिवाजी रोड, अकबर मोहल्ला परिसरात जमावाकडून तोडफोड करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी जमावाला पांगवतानाच प्रत्येक चौकात फौजफाटा तैनात केला आहे.

दरम्यान, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी सांगितले की कोल्हापूरमधील परिस्थिती नियंत्रणात आहे. कोल्हापूर शहरातील शिवाजी चौक परिसर वगळता इतर ठिकाणी शांतता असल्याचे ते म्हणाले. इतर तालुक्यांमध्ये दुकाने सुरु असल्याची माहिती त्यांनी दिली. दरम्यान, कोल्हापूरमध्ये बंदी आदेश असतानाही आंदोलन होत असल्याबद्दल त्यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, काल त्यांनी ठिय्या आंदोलन करणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार ते आंदोलन करत आहेत. आम्ही याबाबत रिस्पॉन्स करत आहोत. विद्यार्थ्यांसह कोणालाही त्रास होऊ नये, यासाठी आंदोलन मागे घ्यावे अशी विनंती पोलीस अधीक्षकांनी हिंदुत्ववादी संघटनांना केली आहे.

admin
Author: admin

और पढ़ें

अमरावतीच्या परतवाडा येथील लैंगिक शोषण, व्हिडीओ व्हायरल (Amravati Paratwada Case)आणि ब्लॅकमेलिंग प्रकरणातील मुख्य आरोपी अयान अहमद याच्याबाबत अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. अयानने आपल्या चैनीसाठी स्वतःच्या आईचे मंगळसूत्र आणि सोन्याचा हार चोरून (Amravati Paratwada Case) विकला होता, अशी माहिती समोर आली आहे. त्याच्या सोशल मीडिया रिल्समधे जे नोटांचे बंडल दिसायचे, ते प्रत्यक्षात आईचे दागिने विकून मिळालेले पैसे होते. अयानला महागड्या हॉटेल्समध्ये जाणे, मुलींवर पैसे खर्च करणे आणि महागडे मोबाईल वापरणे अशा विलासी सवयी होत्या, त्यासाठी त्याने आपल्या आईचे दागिने चोरल्याचं आणि विकल्याचं समोर आलं आहे.(Amravati Paratwada Case) Amravati Video Viral : पैशासाठी स्वतःच्या आईचे मंगळसूत्र आणि सोन्याचा… अमरावतीच्या परतवाडामध्ये तरुणींचे लैंगिक शोषण आणि अश्लील व्हिडिओ व्हायरल केल्याच्या प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. या प्रकरणातील मुख्य आरोपी अयानचा (Amravati Paratwada Case) भयान चेहरा आता समोर आला आहे. पैशासाठी स्वतःच्या आईचे मंगळसूत्र आणि सोन्याचा एक हार चोरून विकला होता. अयानच्या रिल्स मध्ये असलेले नोटांचे बंडल आईचं मंगळसूत्र चोरून विकून मिळालेल्या पैशाचे होते अशी माहिती समोर आली आहे. हॉटेलमध्ये जाणे, मुलींवर पैसे खर्च करणे आणि महागडे मोबाईल वापरणे यांचा अयानला छंद होता. यातूनच तो कर्जबाजारी झाला आणि मग त्याने आईचं मंगळसूत्र ही चोरून विकलं अशी माहिती समोर आली आहे.(Amravati Paratwada Case) Amravati Video Viral : आयनचा थार अन् चार iPhone चा व्हिडीओ व्हायरल, ती कार कोणाची? अमरावतीच्या परतवाडा प्रकरणातील मुख्य आरोपी अयान अहमद याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे, त्यामध्ये तो ‘थार’  (Thar) कारमध्ये बसलेला आहे, त्याच्याकडे चार आयफोन आहेत, हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता ती गाडी कोणाची? गाडीचे मालक कोण आहेत? आणि त्या व्हिडिओमागील सत्य काय आहे?, याची माहिती समोर आली आहे.(Amravati Paratwada Case) अयान ज्या काळ्या रंगाच्या थार गाडीत (MH 27 DL 3111) व्हिडिओ बनवताना दिसला, ती गाडी परतवाडा येथील राजेश रोशनलाल प्रजापती यांच्या मालकीची आहे. राजेश प्रजापती यांचे तिथे ‘संजय ऑटो पार्ट्स’ नावाचे दुकान आहे. राजेश प्रजापती यांचा मुलगा आर्यन प्रजापती याने दिलेल्या माहितीनुसार, त्याची आणि अयानची ओळख OLX वरून झाली होती. आर्यनला अयानकडून एक मोबाईल घ्यायचा होता, त्या संदर्भात त्यांची भेट झाली होती. अयानने आर्यनला सांगितले की तो एक ‘रील क्रिएटर’ असून त्याचे १८,००० फॉलोअर्स आहेत. त्याने आर्यनला विनंती केली की त्याला गाडीसोबत एक व्हिडिओ बनवायचा आहे. ओळखीच्या नात्याने आर्यनने त्याला गाडीत व्हिडिओ बनवू दिला. तर अयानच्या रीलमध्ये दिसणारी बंदूक ही शिकारीची किंवा खरी बंदूक नसून ती शेतात जनावरांना पळवण्यासाठी वापरली जाणारी ‘एअर गन’ (Air Gun) असल्याचा दावा आर्यनने केला आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी राजेश आणि आर्यन प्रजापती यांना पोलीस ठाण्यात बोलावून त्यांची चौकशी केली आणि त्यांचे जबाब नोंदवून घेतले आहेत.