Search
Close this search box.

Kolhapur Crime : डॉक्टरकडे जातोय सांगून घराबाहेर पडला अन्… 200 रुपयांसाठी तरुणाची निर्घृण हत्या

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

डॉक्टरांकडे जाऊन येतो असे सांगून बाहेर पडलेल्या तरुणाचा सिमेंट पाईप डोक्यात घालून निर्घृण खून (Crime News) केल्याची घटना कोल्हापूर (kolhapur News) शहरातील उचगाव मध्ये घडली आहे. पुणे बंगळुरु राष्ट्रीय महामार्गात (pune bangalore national highway) लगत असलेल्या कृषी महाविद्यालयाच्या आवारात एका व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती. त्यानंतर आता या प्रकरणाचा छडा लावण्यास पोलिसांना (kolhapur Police) यश आले आहे. तरुणाच्या खूनाप्रकरणी कोल्हापूर पोलिसांनी पाच संशयितांना ताब्यात घेतले असून तपास सुरु केला आहे.

गणेश नामदेव संकपाळ (राहणार गणेश कॉलनी उचगाव ) असे खून झालेल्या तरुणाचे नाव असल्याचे समोर आले आहे. हा खून केवळ दोनशे रुपयांच्या पानटपरीच्या उधारीवरून झाल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. गणेश हा एका फर्निचर दुकानात काम करत होता. बुधवारी रात्री साडेसातच्या सुमारास गणेश संकपाळ हा डॉक्टरांकडे जाऊन येतो म्हणून घरातून बाहेर पडला होता. पण त्यानंतर मात्र तो घरी परतलाच नाही.

गणेश राहत असणाऱ्या परिसरात संशयित आरोपी विकी जगदाळे याची पानपट्टी आहे. गणेश या पानपट्टीत जाऊन उधारीवर सिगरेटचे पाकीट घेत होता. पण वारंवार उधारी मागून देखील तो देत नसल्याचे पाहून संशयित आरोपी विकी त्याच्या साथीदारांसोबत उधारी वसूल करण्यासाठी त्याच्याकडे गेला होता. यावेळी पैशांवरून दोघात जोरदार वादावादी झाली. या वादवादीचे रूपांतर नंतर हाणामारीत झाले. यावेळी मृत गणेश संकपाळ याच्या पाठीवर आणि पोटावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले. त्यानंतर डोक्यात सिमेंटचा पाईप घालत गणेश संकपाळची निर्घृण खून करण्यात आल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.

पुणे बंगळुरु राष्ट्रीय महामार्गात लगत असलेल्या कृषी महाविद्यालयाच्या आवारात गणेशाचा रक्ताने माखलेला मृतदेह तिथून जात असलेल्या व्यक्तीच्या नजरेस आला होता. याची माहिती गांधीनगर पोलिसांना समजतात गांधीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान गणेश संकपाळ यांच्या पाठीवर आणि पोटावर धारदार शस्त्राने वार करून डोक्यात सिमेंटचा पाईप घालत खून केल्याचे समोर आले. गांधीनगर पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवित अवघ्या तीन तासाच्या आत संशयिताना ताब्यात घेतलं. यामध्ये संशयित आरोपी पानपट्टी चालक विकी जगदाळे ( वय वर्ष 20, रा. चपाले गल्ली ) करण राजेंद्र पुरी ( वय वर्ष 23, रा. रेसकोर्स नाका संभाजीनगर) रतनकुमार रमेश राठोड ( वय वर्ष 20 ) ओम गणेश माने (वय वर्ष 21 तिघेही रा. उचगाव) रोहन गब्बर कांबळे (वय वर्ष 20, रा. टेंबलाई नाका रेल्वे फाटक ) अशा पाच जणांचा समावेश आहे. 5 संशयिताना पोलिसांनी ताब्यात घेतल आहे.

admin
Author: admin

और पढ़ें

अमरावतीच्या परतवाडा येथील लैंगिक शोषण, व्हिडीओ व्हायरल (Amravati Paratwada Case)आणि ब्लॅकमेलिंग प्रकरणातील मुख्य आरोपी अयान अहमद याच्याबाबत अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. अयानने आपल्या चैनीसाठी स्वतःच्या आईचे मंगळसूत्र आणि सोन्याचा हार चोरून (Amravati Paratwada Case) विकला होता, अशी माहिती समोर आली आहे. त्याच्या सोशल मीडिया रिल्समधे जे नोटांचे बंडल दिसायचे, ते प्रत्यक्षात आईचे दागिने विकून मिळालेले पैसे होते. अयानला महागड्या हॉटेल्समध्ये जाणे, मुलींवर पैसे खर्च करणे आणि महागडे मोबाईल वापरणे अशा विलासी सवयी होत्या, त्यासाठी त्याने आपल्या आईचे दागिने चोरल्याचं आणि विकल्याचं समोर आलं आहे.(Amravati Paratwada Case) Amravati Video Viral : पैशासाठी स्वतःच्या आईचे मंगळसूत्र आणि सोन्याचा… अमरावतीच्या परतवाडामध्ये तरुणींचे लैंगिक शोषण आणि अश्लील व्हिडिओ व्हायरल केल्याच्या प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. या प्रकरणातील मुख्य आरोपी अयानचा (Amravati Paratwada Case) भयान चेहरा आता समोर आला आहे. पैशासाठी स्वतःच्या आईचे मंगळसूत्र आणि सोन्याचा एक हार चोरून विकला होता. अयानच्या रिल्स मध्ये असलेले नोटांचे बंडल आईचं मंगळसूत्र चोरून विकून मिळालेल्या पैशाचे होते अशी माहिती समोर आली आहे. हॉटेलमध्ये जाणे, मुलींवर पैसे खर्च करणे आणि महागडे मोबाईल वापरणे यांचा अयानला छंद होता. यातूनच तो कर्जबाजारी झाला आणि मग त्याने आईचं मंगळसूत्र ही चोरून विकलं अशी माहिती समोर आली आहे.(Amravati Paratwada Case) Amravati Video Viral : आयनचा थार अन् चार iPhone चा व्हिडीओ व्हायरल, ती कार कोणाची? अमरावतीच्या परतवाडा प्रकरणातील मुख्य आरोपी अयान अहमद याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे, त्यामध्ये तो ‘थार’  (Thar) कारमध्ये बसलेला आहे, त्याच्याकडे चार आयफोन आहेत, हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता ती गाडी कोणाची? गाडीचे मालक कोण आहेत? आणि त्या व्हिडिओमागील सत्य काय आहे?, याची माहिती समोर आली आहे.(Amravati Paratwada Case) अयान ज्या काळ्या रंगाच्या थार गाडीत (MH 27 DL 3111) व्हिडिओ बनवताना दिसला, ती गाडी परतवाडा येथील राजेश रोशनलाल प्रजापती यांच्या मालकीची आहे. राजेश प्रजापती यांचे तिथे ‘संजय ऑटो पार्ट्स’ नावाचे दुकान आहे. राजेश प्रजापती यांचा मुलगा आर्यन प्रजापती याने दिलेल्या माहितीनुसार, त्याची आणि अयानची ओळख OLX वरून झाली होती. आर्यनला अयानकडून एक मोबाईल घ्यायचा होता, त्या संदर्भात त्यांची भेट झाली होती. अयानने आर्यनला सांगितले की तो एक ‘रील क्रिएटर’ असून त्याचे १८,००० फॉलोअर्स आहेत. त्याने आर्यनला विनंती केली की त्याला गाडीसोबत एक व्हिडिओ बनवायचा आहे. ओळखीच्या नात्याने आर्यनने त्याला गाडीत व्हिडिओ बनवू दिला. तर अयानच्या रीलमध्ये दिसणारी बंदूक ही शिकारीची किंवा खरी बंदूक नसून ती शेतात जनावरांना पळवण्यासाठी वापरली जाणारी ‘एअर गन’ (Air Gun) असल्याचा दावा आर्यनने केला आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी राजेश आणि आर्यन प्रजापती यांना पोलीस ठाण्यात बोलावून त्यांची चौकशी केली आणि त्यांचे जबाब नोंदवून घेतले आहेत.