Search
Close this search box.

मुंबईत तीन दहशतवादी घुसले?; पोलिसांना मिळाली महत्त्वाची माहिती

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

दुबईहून तीन दहशतवादी (Terrorist) मुंबई (Mumbai News) शिरल्याची माहिती समोर आल्याने खळबळ उडाली आहे. मुंबईत तीन दहशतवादी घुसल्याची माहिती देणारा फोन मुंबई पोलीस (Mumbai Police) नियंत्रण कक्षात आल्याने सर्व यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. दुबईहून शुक्रवारी तीन दहशतवादी आल्याची माहिती या फोनवर देण्यात आली आहे. या दहशतवाद्यांचा संबंध पाकिस्तानशी असल्याचा दावा फोन करणाऱ्या व्यक्तीने केला आहे. यापैकी एका दहशतवाद्याचे नाव मुजीब सय्यद असून त्याचा मोबाईल नंबर, गाडीचा नंबरही फोन करणाऱ्या व्यक्तीने पोलिसांना दिला आहे. दरम्यान, राजेश ठोंगे असे फोन करणाऱ्या व्यक्तीचे नाव असून त्याचाही पोलीस शोध घेत आहेत.

admin
Author: admin

और पढ़ें