Search
Close this search box.

PM Modi Mumbai Visit LIVE: पंतप्रधान मोदी यांनी दाखवला वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आज (10 फेब्रुवारी) मुंबई (Mumbai) दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा गेल्या महिन्याभरातील दुसरा मुंबई दौरा आहे. याआधी 19 जानेवारीला नरेंद्र मोदींनी मुंबईत विविध विकास कामांचा शुभारंभ आणि दोन मेट्रोचं लोकार्पण केलं होतं. यानंतर 21 दिवसांत नरेंद्र मोदी पुन्हा एकदा मुंबई दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्याच्या निमित्ताने भाजपा मुंबई महापालिका निवडणुकीची (BMC Election) तयारी करत असल्याचं बोललं जात आहे.

दरम्यान आजच्या मुंबई दौऱ्यात नरेंद्र मोदींच्या हस्ते दोन वंदे भारत गाडय़ांना हिरवा झेंडा दाखवला जाईल. तसंच पायाभूत सुविधा प्रकल्प आणि सैफी अकादमीच्या अंधेरी पूर्व येथील संकुलाचे उद्घाटन होणार आहे.

admin
Author: admin

और पढ़ें