सोने चांदी दरात घसरणीचा उतरता आलेख कायम असल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या चोवीस तासात सोन्याच्या दरात एक हजार रुपयांची तर दोन दिवसात एकूण सात हजार रुपयांची घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे.
चांदीच्या दरात देखील चोवीस तासात एक हजार रुपयांची तर दोन दिवसात दहा हजार रूपयांची घसरण (Gold Silver Rate)
झाल्याचं पाहायला मिळत आहे. जागतिक पातळीत वधारलेले डॉलर आणि अमेरिकन फेडरल बँकाच्या व्याज दरात वाढ होण्याचे संकेत, याचा सोने चांदी दरात (Gold Silver Rate) घसरण झाल्याचा हा परिणाम मानला जात आहे. दोन दिवसापूर्वी सोन्याचे 130000 रुपये असलेले दर आज 123000 वर खाली आले आहेत, तर चांदीच्या 164000 रुपये असलेले दर आज 154000 वर खाली आले आहेत. सध्या जागतिक आर्थिक परिस्थिती पाहता अजूनही दर खाली जाण्याचा अंदाज असला तरी जानेवारी नंतर मात्र पुन्हा सोने चांदी दरात वाढ होण्याचा अंदाज सुवर्ण व्यावसायिकांनी व्यक्त केला आहे.(Gold Silver Rate)
सुवर्ण व्यासायिक सागर भंगाळे यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं की, मागील दोन दिवसांमध्ये जवळपास सोन्यामध्ये 7 हजार रुपयाची आणि चांदीमध्ये 10 हजार रुपये घसरण झालेली आहे. दोन दिवसांपूर्वी जर सोन्याचा भाव होता 1 लाख 30 हजार रुपये होता, आणि आज जवळपास 1 लाख 23 हजार 500 आहे, आणि चांदीचा 1.64 होता, आज 1.54 आहे. याचं मुख्य कारण म्हणजे डॉलर ऑल टाईम हाय आहे, डॉलर खूप वाढलेला आहे, आणि आता डिसेंबर महिन्यामध्ये गव्हर्मेंटची, यूएस गव्हर्मेंटची मीटिंग आहे, तिच्यामध्ये ते रेट हाय करण्याची शक्यता आहे. त्या एक्सपेक्टेशनमुळे सोनं आणि चांदीमध्ये मंदी आलेली आहे आणि दुसरं कारण म्हणजे जे गव्हर्मेंट बॉण्ड्स आहेत, त्याच्यावरती ऑल टाईम हाय 5% रेट ऑफ इंटरेस्ट भेटतोय, जो मागच्या काळामध्ये 3 ते 4% होता, ते पण ऑल टाईम हाय रेट, इंटरेस्ट रेट, त्याच्यामुळे कमी झालेले आहेत. भाव वाढतील की आणखी कमी होतील हे पुढचं काय सांगता येत नाही. जर का असंच राहिलं, शॉर्ट टर्ममध्ये कमी होण्याचे चान्सेस आहेत दर कमी होण्याचे, पण लॉंग टर्ममध्ये 100% रेट वाढतील.(Gold Silver Rate)
ग्राहकांसाठी सुवर्णसंधी ही, सोनं ऑल टाईम लो झालेलं आहे वर्षभराच्या तुलनेमध्ये, जवळपास 1 लाखाहून आज सोनं जवळपास 1 लाख 23 वरती आलेलं आहे, चांदी पण ऑल टाईम लो आहे. ग्राहकांसाठी मला असं वाटतं सुवर्णसंधी आहे, याचा पूर्ण लाभ घ्यावा ग्राहकांनी. आता व्यापाराचं नुकसान होतंच आहे, पण तो बिझनेसचा पार्ट आहे,त्याचं काय करू शकत नाही, पण रिकव्हरी होईल मला असं वाटतं सोन्याच्या आणि चांदीच्या दोघांची दराची. मला वाटतं की जानेवारीपासून पुन्हा सोन्या चांदीच्या दरात तेजी येईल,असंही सागर भंगाळे यांनी म्हटलंय.
Gold Silver Rate: 9 दिवसांत सोने किती स्वस्त झाले?
सोन्याच्या किमतीतील घसरण सलग 9 दिवसांपासून सुरू आहे. 9 नोव्हेंबर रोजी दिल्लीच्या सराफा बाजारात सोने 1,46,900 रुपये प्रति 10 ग्रॅमवर होते. आता ते घसरून 1,29,300 रुपयांवर आले आहे. म्हणजेच या 9 कारोबारी सत्रांमध्ये सोन्याची किंमत 17,600 रुपये किंवा सुमारे 12 टक्क्यांनी कमी झाली आहे.सोन्याचा सध्याचा भाव नोव्हेंबर 2025 नंतरचा सर्वात खालचा स्तर मानला जात आहे. या वर्षी जानेवारीच्या अखेरीस सोने सुमारे 1.83 लाख रुपये प्रति 10 ग्रॅमच्या विक्रमी स्तरावर पोहोचले होते. तिथून आतापर्यंत त्याची किंमत 53,700 रुपये म्हणजेच सुमारे 29.3 टक्क्यांनी घसरली आहे.
Gold Silver Rate: चांदीत किती घसरण झाली?
चांदीच्या किमतीतील घसरणीचा परिणाम अधिक तीव्र दिसून येत आहे. शनिवारी एक किलो चांदीचा भाव 1.58 लाख रुपये राहिला आहे. 5 नोव्हेंबर रोजी चांदी 1,94,500 रुपये प्रति किलोवर होती. या हिशेबाने सुमारे 16 दिवसांत तिची किंमत 36,500 रुपये म्हणजेच जवळपास 19 टक्क्यांनी कमी झाली आहे.
Gold Silver Rate: सोने-चांदी का सातत्याने कोसळत आहेत?
सोने-चांदी मधील घसरणीमागे आंतरराष्ट्रीय बाजारात निर्माण झालेली परिस्थिती हे मोठे कारण आहे. अमेरिकन डॉलर मजबूत स्थितीत आहे आणि तिथल्या सरकारी बॉन्ड्सवर मिळणारा परतावा देखील वाढला आहे. याशिवाय अमेरिकेत व्याजदर वाढण्याची शक्यता बळावल्याने सोने आणि चांदीवर दबाव आला आहे. खरे तर सोने आणि चांदी आपल्या गुंतवणूकदारांना व्याज देत नाहीत. अशा परिस्थितीत बॉन्ड्ससारख्या इतर गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळण्याची अपेक्षा असते, तेव्हा काही गुंतवणूकदार मौल्यवान धातूंमधून पैसा काढून घेऊ लागतात. त्यामुळे बाजारात विक्री वाढते आणि किमती खाली येऊ लागतात.
एचडीएफसी सिक्युरिटीजचे (HDFC Securities) वरिष्ठ जिंस विश्लेषक सौमिल गांधी यांच्या मते, अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयात झालेल्या मजबुतीने देशांतर्गत बाजारातील सोन्याच्या घसरणीला अधिक वेग दिला आहे. दुसरीकडे, गुंतवणूकदारांचे लक्ष आता 9 डिसेंबर रोजी होणाऱ्या अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या बैठकीकडे लागले आहे. व्याजदरांबाबत होणारा कोणताही मोठा निर्णय पुढेही बाजारात चढ-उतार आणू शकतो.








