Search
Close this search box.

Dia Mirza Diwali Video Controversy: दिया मिर्झाला ट्रोल करणाऱ्या वाचाळ राजकारण्यांना मुंबई हायकोर्टानं झाडलं, डिलीट केलेला व्हिडीओ पुन्हा पोस्ट करण्याचे आदेश

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

सध्या सोशल मीडियावर दिया मिर्झाच्या (Dia Mirza) दिवाळीच्या शुभेच्छा देणाऱ्या एका व्हिडीओवरुन (Dia Mirza Diwali Video Controversy) जबरदस्त चर्चा सुरू आहे. या व्हिडीओवरुन अभिनेत्री दिया मिर्झाला (Actress Dia Mirza) जबरदस्त ट्रोलिंगचा सामना करावा लागतोय. अशातच, आता दिया मिर्झाच्या व्हिडीओवर (Dia Mirza Video) टीका करणाऱ्या भाजप नेत्यांना मुंबई हायकोर्टानं दणका दिला आहे. अभिनेत्री दिया मिर्झाच्या फटाके न फोडण्याच्या आवाहन करणाऱ्या व्हिडीओवर टीका करणाऱ्या भाजप नेत्यांना मुंबई हायकोर्टानं फटकारलं आहे. तसेच, हटवण्यात आलेला दिया मिर्झाचा व्हिडीओ पुन्हा सोशल मीडियावर अपलोड करण्याचे निर्देश हायकोर्टानं BMC ला दिले आहेत.

महाराष्ट्राची (Maharashtra News) राजधानी मुंबईत (Mumbai News), बृहन्मुंबई महानगरपालिकेनं (BMC) प्रदूषणाच्या समस्येवर मात करण्यासाठी एका मोहिमेचं आयोजन केलंय. या मोहिमेसाठी अभिनेत्री दिया मिर्झा (Actress Dia Mirza) आणि क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) यांच्यासह अनेक नामवंत व्यक्तींची निवड करण्यात आलेली. पण, या उपक्रमात दिया मिर्झाचा समावेश केल्यामुळे वाद निर्माण झाला. भाजप नेते अमित साटम (BJP leader Amit Satam) यांनी यावर नाराजी व्यक्त केली. त्यांनी म्हटलं की, दिवाळी (Diwali 2026) कशी साजरी करावी, हे शिकण्यासाठी आपल्याला दिया मिर्झाची गरज नाही. अमित साटम यांनी ट्विटरवर केलेल्या पोस्टनंतर, मुंबई महानगरपालिकेनं दिया मिर्झाचा व्हिडीओ डिलिट केला. त्यानंतर अनेक भाजप नेत्यांनी तिच्यावर टीका केली. याच प्रकरणाची गंभीर दखल घेत आता हायकोर्टानं मुंबई महापालिकेवर ताशेरे ओढले आहेत.

दिवाळीच्या शुभेच्छा देणाऱ्या दिया मिर्झाच्या व्हिडीओवर भाजप नेत्यांकडून टीकेची झोड उठवण्यात आलेली. अशातच अभिनेत्रीवर टीका करणाऱ्या भाजव नेत्यांना हायकोर्टानं दणका दिला आहे. अभिनेत्री दिया मिर्झाच्या फटाके न फोडण्याच्या आवाहन करणाऱ्या व्हिडिओवर टीका करणाऱ्या भाजप नेत्यांना मुंबई हायकोर्टानं फटकारलं आहे. सार्वजनिक रस्त्यांवर फटाके फोडू नयेत, या न्यायालयाच्या निर्देशांबाबत जनजागृती करण्यासाठी BMC नं दिया मिर्झाची मदत घेतली होती. मात्र, भाजप नेत्यांनी आक्षेप घेतल्यानंतर BMC नं आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून हा व्हिडीओ हटवला. काही राजकीय नेत्यांच्या वक्तव्यांमुळे आपण अस्वस्थ असल्याचं निरीक्षण न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती डॉ. नीला गोखले यांच्या खंडपीठानं नोंदवलं आहे. तसेच, “भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे…”, असं स्पष्ट करत हायकोर्टानं राजकीय नेत्यांना सुनावलं आहे. त्यासोबतच हटवण्यात आलेला दिया मिर्झाचा व्हिडीओ पुन्हा सोशल मीडियावर अपलोड करण्याचे BMC ला हायकोर्टानं निर्देश दिले आहेत.

BMC नं डिलिट केलेल्या व्हिडीओत दिया मिर्झा काय म्हणालेली? 

दिवाळीनिमित्त दिया मिर्झानं चाहत्यांसाठी एक खास व्हिडीओ पोस्ट केलेला. या व्हिडीओमध्ये तिनं म्हटलेलं की, “नमस्कार, दिवाळी उत्सव जवळ आला आहे. उत्सव साजरा करत असताना आपल्याला पर्यावरण आणि आरोग्य या दोन्हीची काळजी घ्यायची आहे. फटाक्यांमुळे होणारं ध्वनी आणि वायू प्रदूषण हे आपल्या सगळ्यांसाठी हानिकारक आहे. माझं तुम्हाला आवाहन आहे की, दिवाळी आवाजांनी नाही तर आनंदांनी साजरी करा. तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा!”

admin
Author: admin

और पढ़ें