Search
Close this search box.

IPS RPS Maharashtra Police Officers Transfer List: 16 आयपीएस आणि आरपीएस अधिकाऱ्यांची बदली, ठाण्यातील 3 वरिष्ठ पोलिसांना मुदतवाढ; पाहा संपूर्ण यादी!

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

महाराष्ट्र पोलीस दलातील वरिष्ठ आयपीएस आणि आरपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश गृह विभागाकडून जारी (IPS RPS Police Officers Transfer List) करण्यात आले आहेत. या आदेशात ठाणे पोलीस दलातील तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांना एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आल्याने विशेष लक्ष वेधले जात आहे. तर महाराष्ट्र पोलीस दलातील 16 वरिष्ठ आयपीएस आणि आरपीएस अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे.

गृह विभागाने 2 नोव्हेंबर 2026 रोजी जारी केलेल्या शासन आदेशानुसार, पोलीस आस्थापना मंडळ क्रमांक एकच्या शिफारशीनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये ठाणे शहर पोलीस दलातील गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अमरसिंग जाधव आणि परिमंडळ क्रमांक 5 चे पोलीस उपायुक्त प्रशांत कदम यांच्यासह कोकण परिक्षेत्राच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे शिवराज पाटील यांना एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे. या मुदतवाढीमुळे संबंधित अधिकाऱ्यांना त्यांच्या जबाबदारीच्या पदावर आणखी एक वर्ष काम करण्याची संधी मिळाली आहे. (IPS RPS Maharashtra Police Officers Transfer List)

ठाण्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आलेली एक वर्षाची मुदतवाढ चर्चेचा विषय- (Maharashtra Police Officers Transfer List)

दरम्यान, याच शासन आदेशात ठाणे ग्रामीणचे अपर पोलीस अधीक्षक अनमोल मित्तल यांची अंबेजोगाई, बीड येथे बदली करण्यात आली आहे. तर ठाणे शहराच्या परिमंडळ क्रमांक 1 च्या पोलीस उपायुक्त मिना मखवाना यांची ठाणे ग्रामीणच्या अपर पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच जयंत बजबळे यांची पोलीस उपायुक्त, ठाणे शहर येथे नियुक्ती करण्यात आली आहे. एकीकडे राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे सत्र सुरू असताना दुसरीकडे ठाण्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आलेली एक वर्षाची मुदतवाढ चर्चेचा विषय ठरत आहे.

ठाण्यातल्या पोलीस दलात वरिष्ठांना मुदतवाढ- (Thane Police Officer News)

ठाणे पोलीस दलातील तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांना एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे. ठाणे शहर गुन्हे शाखेचे पो.उपायुक्त अमरसिंग जाधव, परिमंडळ क्रमांक 5 चे पोलीस उपायुक्त प्रशांत कदम, कोकण परिक्षेत्राच्या एसीबीचे शिवराज पाटील यांना एका वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे. ठाणे ग्रामीणचे अपर पो.अधीक्षक अनमोल मित्तल यांची अंबेजोगाईला बदली झाली आहे. ठाणे शहर पो.उपायुक्त मिना मखवाना आता ठाणे ग्रामीणच्या अपर पोलीस अधीक्षक असणार आहेत. जयंत बजबळे यांची ठाणे शहरासाठी पोलीस उपायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

16 आयपीएस आणि आरपीएस अधिकाऱ्यांची बदली, ठाण्यातील 3 वरिष्ठ पोलिसांना मुदतवाढ; पाहा संपूर्ण यादी- (IPS RPS Police Officers Transfer List)

 

अ. क्र. अधिकारी नाव (श्री. / श्रीम.)
विद्यमान पदस्थापना बदलीने पदस्थापना 1 अनमोल मित्तल अपर पोलीस अधीक्षक, ठाणे (ग्रामीण) अपर पोलीस अधीक्षक, अंबाजोगाई, बीड 2 आकांक्षा यादव उपविभागीय पोलीस अधिकारी, रत्नागिरी उपविभाग, रत्नागिरी उपविभागीय पोलीस अधिकारी, औसा, लातूर 3 संदीप जाधव प्रतीक्षाधीन उपविभागीय पोलीस अधिकारी, औसा, नांदेड 4 शिवराज पाटील अपर पोलीस अधीक्षक, नांदेड एक वर्ष मुदतवाढ (त्याच पदावर) 5 अमरसिंग जाधव पोलीस उप आयुक्त, गुन्हे शाखा, ठाणे शहर एक वर्ष मुदतवाढ (त्याच पदावर) 6 प्रशांत कदम पोलीस उप आयुक्त, परिमंडळ 5, ठाणे शहर एक वर्ष मुदतवाढ (त्याच पदावर) 7 मीना मखवाना अपर पोलीस अधीक्षक, ठाणे (ग्रामीण) पोलीस उप आयुक्त, परिमंडळ 1, ठाणे शहर 8 वैशाली ईश्वर कडुकर अपर पोलीस अधीक्षक, सातारा पोलीस अधीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे 9 चेतना तिडके अपर पोलीस अधीक्षक, अंबाजोगाई, बीड पोलीस अधीक्षक (अभियान), अमली पदार्थ विरोधी पथक, नागपूर 10 जयंत बजबळे पोलीस अधीक्षक, नागरी हक्क संरक्षण, ठाणे प्रतीक्षाधीन / पदस्थापना बदल 11 सूरज गुरव पोलीस उप आयुक्त, ठाणे शहर अपर पोलीस अधीक्षक, नांदेड 12 नरसिंग यादव प्रतीक्षाधीन अपर पोलीस अधीक्षक, सातारा / पोलीस अधीक्षक, नागरी हक्क संरक्षण, ठाणे 13 धनंजय अनंत जाधव सहायक पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड पोलीस उप अधीक्षक, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, सातारा 14 विकास संपत नाईक पोलीस उप अधीक्षक, नागरी हक्क संरक्षण, नागपूर अपर उप आयुक्त, राज्य गुप्तवार्ता विभाग, मुंबई 15 संकेत सतीश गोसावी पोलीस उप अधीक्षक, गुअवि, पुणे उपविभागीय पोलीस अधिकारी, रत्नागिरी उपविभाग, रत्नागिरी 16 कुमार भिकाजी चौधरी उपविभागीय पोलीस अधिकारी, औसा उपविभाग, लातूर पोलीस उप अधीक्षक, महाराष्ट्र पोलीस अकादमी, नाशिक 17 सुधीर पुंडलिक नांदणवार प्रतीक्षाधीन उपविभागीय पोलीस अधिकारी, तुमसर उपविभाग, भंडारा 18 संतोष वैरागडे सहायक पोलीस आयुक्त, दहशतवाद विरोधी पथक उपविभागीय पोलीस अधिकारी, मालेगाव कॅम्प उपविभाग, नाशिक 19 श्रीकांत चंद्रकांत कांकाळ पोलीस उप अधीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा, बीड पोलीस उप अधीक्षक,अनुसूधचत जमाती प्रमाणपत्र पडताळणी सधमती, धकनिट, मुख्यालय छ.
सांभाजीनगर
admin
Author: admin

और पढ़ें