Search
Close this search box.

एल निनो अन् दुष्काळामुळे संपूर्ण राज्यात ‘पाणी’बाणी! 16 ऑक्टोबरपासून…; राज्य शासनाचे सर्व स्थानिक संस्थांना आदेश

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

एल निनोमुळं महाराष्ट्रावर दुष्काळाचे सावट आहे. महाराष्ट्रात ट्रिगर-1चा दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. तसंच, एल निनोची स्थिती अधिक तीव्र झाली तर त्याचा परिणाम जलसाठ्यांवर होण्याची शक्यता आहे. त्यामुळं आत्ताजरी धरणांमध्ये पाणीसाठी असला तरी उन्हाळ्यापर्यंत तो टिकवून ठेवण्याचे आव्हान आहे. उन्हाळ्यात किंवा 2027 पर्यंत पाण्याची टंचाई भासू नये म्हणून पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे. 16 ऑक्टोबरपासून राज्यातील सर्व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये किमान 10 टक्के पाणीकपात लागू करण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती जलसंपदामंत्री गिरीश महाजन सोमवारी दिली.

२०२६च्या खरीप हंगामातील कळ-१ लागू झालेल्या राज्यातील २८४ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. पुढील वर्षापर्यंत अल-निनोचा प्रभाव राहण्याची शक्यता लक्षात घेऊन जलसंपदा विभागाने सर्व संबंधित यंत्रणांना पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे निर्देश दिले आहेत.

औद्योगिक क्षेत्राने उपलब्ध एकूण वापरापैकी किमान 30 टक्के पाण्याचा पुनर्वापर करणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्यासाठी पायाभूत सुविधा उभ्या कराव्यात. प्रक्रिया केलेले पाणी वापरणे शक्य असेल तेथे पिण्याच्या पाण्याचा वापर कमी करावा, असे बजावण्यात आले आहे.

एल निनोचा प्रभाव कधीपर्यंत?

‘एल निनो’चा प्रभाव मार्च 2027 पर्यंत कायम राहणार असल्याचा अंदाज जागतिक हवामान संघटनेने व्यक्त केला आहे. ऑक्टोबरमध्ये किमान व कमाल तापमानात मोठी वाढ होणार असून, देशभरात कोरडे व उष्ण वातावरण राहणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने त्यांच्या ‘पोस्ट मान्सून आऊटलूक ‘मध्ये व्यक्त केला आहे.

एल निनो नोव्हेंबर 2026 मध्ये तीव्र असेल आणि त्याचा प्रभाव मार्च 2027 पर्यंत कायम राहणार असल्याने थंडीअभावी गहू, हरभन्यासह इतर सर्वच रब्बी पिके तगून राहणार नाहीत. आधीच खरीप हंगाम हातचा गेला, त्यातच रब्बी पिकांची आशा आताच मावळल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. यावर्षी देशात सरासरीपेक्षा 87 टक्के पाऊस झाल्याने सन 1901 पासून आजवरचा 13 व्या क्रमांकाचा, 2001 पासून आजवरचा चौथ्या आणि 2015 नंतरचा पहिल्या क्रमांकाचा कमी पावसाळा ठरला आहे. यंदाचा पावसाळा सन 1901 पासून सर्वाधिक उष्ण ठरला.

admin
Author: admin

और पढ़ें