Search
Close this search box.

मुंबई हादरली! ‘पप्पा, दुसरं लग्न करू नका’, म्हणणाऱ्या तरुणीसोबत भयंकर कांड, घरात एकटी असताना बापानेच…

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

मुंबईतील वडाळा परिसरातील एक अत्यंत धक्कादायक घटनेमुळे हादरली आहे. परिसरात एका २० वर्षीय तरुणीच्या मृत्यूने खळबळ उडाली आहे. राहत्या घरात घडलेल्या या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सुरुवातीला हा नेमका काय प्रकार आहे, याचा उलगडा होत नव्हता. मात्र, तपास जसजसा पुढे गेला तसेतसे या प्रकरणातील धक्कादायक गोष्टी समोर आलीय.

मृत तरुणीचे नाव रिफत शरीफ खान असून वडाळा पूर्वेतील मेडॉना कॉलनीत ही घटना घडली. रिफतच्या मृत्यूची माहिती मिळाल्यानंतर वडाळा पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांना तिच्या गळ्याभोवती जखमा आणि खुणा आढळून आल्या. त्यामुळे हा नैसर्गिक मृत्यू नसल्याचा संशय अधिक बळावला.

पण या प्रकरणाचा पोलीस तपास करत असताना मुलीच्या मृत्यमागे रिफतच्या वडिलांचे नाव समोर आले. शरीफ रझा हुसेन खान (वय ४५) असं त्यांचं नाव आहे. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली. चौकशीत या प्रकरणामागे कौटुंबिक वाद असल्याची माहिती समोर आली.

शरीफ खान यांना दुसरे लग्न करायचे होते. मात्र, रिफतचा त्यांच्या या निर्णयाला विरोध होता. याच मुद्द्यावरून वडील आणि मुलीमध्ये वाद होत असल्याचे तपासात समोर आले आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, घरात कोणीही नसताना रिफतचा गळा आवळण्यात आल्याचा संशय आहे.

तपासाअंती वडाळा पोलिसांनी शरीफ रझा हुसेन खान यांना हत्येच्या आरोपाखाली अटक केली. रिफतचा मृतदेह केईएम रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. या प्रकरणी वडाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, घटनेमागील नेमका घटनाक्रम आणि इतर बाबींचा पोलीस अधिक तपास करत आहेत.

admin
Author: admin

और पढ़ें