Search
Close this search box.

शिंदेसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रेंना सुप्रीम कोर्टाचा दणका! 3 दिवसांत आत्मसमर्पणाचे आदेश

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

कल्याण डोंबिवलीचे शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. सु्प्रीम कोर्टाने रमेश म्हात्रेंचा जामीन रद्द केला असून पुढील तीन दिवसांमध्ये त्यांना आत्मसमर्पणाचे आदेश देण्यात आले आहेत. महाराष्ट्र सरकारने म्हात्रे यांचा जामीन रद्द करण्यासाठी दाखल केलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांच्या खंडपीठासमोर झाली तेव्हा हा आदेश देण्यात आला आहे. यावेळी कोर्टाने स्पष्टपणे सांगितलं की, वैद्यकीय समुदायाला कोणीही हात लावू शकत नाही. डॉक्टर हे नागरिकांची सेवा करतात आणि त्यांच्यावर अशा प्रकारे हल्ला केला जाऊ शकत नाही. दरम्यान मुंबई उच्च न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला होता त्यानंतर राज्य सरकारकडून जामीन रद्द करण्यासाठी सु्प्रीम कोर्टात धाव घेतली होती. डॉक्टरांना मारहाण केल्याच्या प्रकरणात अटकेत असलेल्या नगरसेवक रमेश म्हात्रेसह चौघां आरोपींना मुंबई हाय कोर्टाकडून जामीन मंजूर केला गेला होता. त्यामुळे राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात अर्ज केला होता.

 

admin
Author: admin

और पढ़ें