Search
Close this search box.

पुणे मेट्रोला गणेशोत्सवकाळात प्रवाशांचा अभूतपूर्व प्रतिसाद, 12 दिवसात मिळालं 7.49 कोटींहून अधिक उत्पन्न

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

पुणे मेट्रो ही प्रवाशांची दुसरी लाईफलाईन बनत असून गणेशोत्सव काळात पुणे मेट्रोला प्रवाशांनी अभूतपूर्व प्रतिसाद दिला. गणेशोत्सवाच्या सुरुवातीपासून म्हणजेच 14 सप्टेंबर ते 25 सप्टेंबर 2026 या 12 दिवसांच्या संपूर्ण कालावधीत तब्बल 48,32,915 प्रवाशांनी मेट्रोने प्रवास केला. या 12 दिवसांच्या कालावधीत पुणे मेट्रोला 7,49,28,377 रुपये इतके महसुली उत्पन्न प्राप्त झाले आहे. अनंत चतुर्दशीच्या विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी, 25 सप्टेंबर सकाळी 6 ते 26 सप्टेंबर सकाळी 6 या 24 तासांत 5,80,280 प्रवाशांनी मेट्रो सेवेचा लाभ घेतला असून एकाच दिवसात 85,61,895 रुपयांचे उत्पन्न मेट्रोला मिळाले आहे.

पुणे मेट्रोच्या प्रवाशांच्या संख्येत गेल्या दोन वर्षांत (2024 ते 2026 ) ऐतिहासिक आणि मोठी वाढ झाली आहे. 2024 च्या गणेशोत्सवात मेट्रोने प्रवास करणाऱ्या भाविकांची संख्या 20,45,100 इतकी होती, जी 2025 मध्ये वाढून 37,17,578 वर पोहोचली. तर यंदा 2026 च्या गणेशोत्सवात हाच आकडा 48,32,915 प्रवाशांवर पोहोचला आहे. गेल्या दोन वर्षांतील आकडेवारीची तुलना केल्यास 2025 च्या तुलनेत यंदा 2026 मध्ये प्रवासी संख्येत 29.99 % ची मोठी वाढ नोंदवली गेली आहे. तसेच 2024 च्या तुलनेत 2026 च्या गणेशोत्सव कालावधीतील एकूण प्रवासी संख्येत तब्बल 136.32.% ची अवाढव्य वाढ झाली असून पुणे मेट्रोची प्रवासी संख्या गेल्या दोन वर्षांत दुप्पटीहून अधिक झाली आहे.

गणेशोत्सव काळातील मार्गिकानिहाय कामगिरी (14 ते 25 सप्टेंबर) :

 * मार्गिका 1 : पीसीएमसी ते स्वारगेट):
* एकूण प्रवासी संख्या: 25,15,516
* एकूण उत्पन्न:  4,17,46,626 रुपये

 * मार्गिका 2 : वनाज ते रामवाडी):
* एकूण प्रवासी संख्या: 23,17,399
* एकूण उत्पन्न: 3,31,81,751 रुपये

 * जिल्हा न्यायालय (District Court) स्थानक (Interchange):
गणेशोत्सव कालावधीत एकूण 10,39,452 प्रवाशांनी जिल्हा न्यायालय स्थानकावर मार्गिका बदल करून मेट्रोच्या जोडणी व्यवस्थेचा मोठा फायदा घेतला.

गणेशोत्सवात मोठा प्रतिसाद मिळालेली टॉप 5 मेट्रो स्थानके : 

गणेशोत्सवाच्या संपूर्ण 10 दिवसांत सर्वाधिक प्रवासी संख्या आणि महसूल नोंदवणारी प्रमुख 5 स्थानके खालीलप्रमाणे आहेत:

1. महात्मा फुले मंडई:
प्रवासी संख्या: ६,८२,४७३
उत्पन्न: रु. १,०१,८५,२५५
2. पीसीएमसी:
प्रवासी संख्या: ४,७२,६५८
उत्पन्न: रु. ९९,६९,८४९
3. स्वारगेट:
प्रवासी संख्या: ४,३५,४८९
उत्पन्न: रु. ६३,२२,२१३
4. रामवाडी:
प्रवासी संख्या ४,०५,४४७
उत्पन्न: रु. ६५,९५,००८
5. पीएमसी:
प्रवासी संख्या २,६९,४७७
उत्पन्न: रु. ३७,४६,१६१

गणेशोत्सवाच्या १२ दिवसांत ७१% प्रवाशांनी डिजिटल तिकिट प्रणालीचा वापर केला, तर २९% प्रवाशांनी कागदी तिकीट खरेदी केले. यामध्ये एकूण ८६% प्रवाशांनी डिजिटल पद्धतीने (Online/UPI/Card) पेमेंट केले, तर १४% प्रवाशांनी रोख रक्कमेचा वापर केला.

गणेश विसर्जनाच्या दिवशी तब्बल ११ मेट्रो स्थानकांवर प्रत्येकी २० हजारांहून अधिक प्रवाशांची प्रवास केला. यामध्ये महात्मा फुले मंडई स्थानक ७०,३७५ प्रवासी व रु. ९,४६,२३५ उत्पन्नासह अग्रस्थानी राहिले. त्यापाठोपाठ डेक्कन जिमखाना ६४,९३८ प्रवासी (रु. ७,५४,१२९), स्वारगेट ४८,९०६ प्रवासी (रु. ६,३४,९१२), पीसीएमसी ४३,४९१ प्रवासी (रु. ९,२४,९२४), रामवाडी ३७,८९४ प्रवासी (रु. ६,६८,०७७) आणि पीएमसी स्थानकात ३६,५८८ प्रवाशांची नोंद झाली. तसेच वनाज ३०,६८६, नळ स्टॉप  ३०,५१९, गरवारे कॉलेज २६,८३२, छत्रपती संभाजी महाराज उद्यान  २३,३५० आणि पुणे रेल्वे स्टेशन स्थानकात २०,१४९ प्रवाशांनी प्रवास केला.

admin
Author: admin

और पढ़ें