Search
Close this search box.

DJ बंदीसाठी पुणेकर रस्त्यावर, मुंबईत मात्र गणपतीच्या 10 पैकी ‘या’ 4 दिवशी रात्री उशीरापर्यंत DJ चा दणदणाट; सरकारनेच दिली परवानगी

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

सण समारंभांच्या काळात मोठं मोठ्या आवाजात डीजे लावून दंगा करू नये अशी मागणी अनेकदा सुजाण नागरिकांकडून केली जाते. यंदाच्या गणेशोत्सवात सुद्धा पुण्यात डीजे बंदी करावी या मागणीसाठी पुणेकर रविवारी रस्त्यावर उतरले होते. मात्र त्याउलट चित्र हे मुंबईत पाहायला मिळत आहे. मुंबईत गणेशोत्सवादरम्यान मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांनी चार दिवस रात्री उशिरापर्यंत लाऊडस्पीकर वापरण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे आता गणेशोत्सव काळात रात्री उशीरापर्यंत मुंबई आणि उपनगरात डीजेचा दणदणाट ऐकू येणार आहेत.

चार दिवस रात्री उशिरापर्यंत लाऊडस्पीकर वापरण्यास परवानगी : 

गणेशोत्सवादरम्यान मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांनी चार दिवस रात्री उशिरापर्यंत लाऊडस्पीकर वापरण्यास परवानगी दिली आहे. मुंबईत गणेशोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी, पाचव्या दिवशी, गौरी विसर्जनाच्या दिवशी आणि अनंत चतुर्दशीला लाऊडस्पीकर वापरण्यास परवानगी देण्यात आली आहे.

मात्र ज्या दिवशी विसर्जनाचा दिवस नसतो, त्या दिवशी मंडळांना स्थानिक कार्यक्रम आयोजित करण्यासाठी आणखी एका दिवसाची रात्री उशिरापर्यंत लाऊडस्पीकर वापरण्याची परवानगी देण्याचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आला आहे. मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या अधिकारक्षेत्रातील 15 पैकी 13 दिवसांची यादी जाहीर केली आहे. त्यामुळे मुंबई उपनगरात गणेशोत्सवादरम्यान 4 दिवस रात्री उशिरापर्यंत लाऊडस्पीकर वापरता येणार आहे.

काय आहे नियम? 

ध्वनी प्रदूषण (नियमन आणि नियंत्रण) नियम 2000 नुसार, काही विशिष्ट दिवशी सकाळी 6 ते मध्यरात्री 12 वाजेपर्यंत ध्वनीची मर्यादा लागू असते. धार्मिक किंवा सांस्कृतिक कारणांसाठी लाऊडस्पीकर अथवा ध्वनिवर्धक उपकरणांचा वापर करण्यास परवानगी देण्याची तरतूद आहे. मुंबई शहरासाठी निश्चित करण्यात आलेल्या 15 सणांच्या दिवसांमध्ये नवरात्री, दिवाळी, ख्रिसमस आणि ईद यांसारख्या सणांचा समावेश आहे. यापैकी गणेशोत्सवासाठी चार दिवस निश्चित करण्यात आले आहेत. या चार दिवसांमध्ये 15 सप्टेंबर रोजी होणारे दीड दिवसांचे गणेश विसर्जन, 18 सप्टेंबर रोजी होणारे पाच दिवसांचे विसर्जन, 19 सप्टेंबर रोजी होणारे गौरी विसर्जन आणि 25 सप्टेंबर रोजी होणारी अनंत चतुर्दशी यांचा समावेश आहे. या चार दिवसांमध्ये रात्री उशिरापर्यंत लाऊडस्पीकर वापरण्यास परवानगी देण्यात आली आहे.

admin
Author: admin

और पढ़ें