Search
Close this search box.

एकीकडे आंदोलनं सुरु असतानाच दुसरीकडे NEET Paper Leak प्रकरणातील मुख्य आरोपी सुटला! CBI म्हणाली, पुरावेच नाहीत

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

एकीकडे  नवी दिल्लीपासून ते मुंबईपर्यंत आणि मिझोरमपासून ते गुजरातपर्यंत विद्यार्थी रस्त्यांवर उतरतून नीट परीक्षेतील पेपरफुटीसंदर्भात आंदोलन करत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागत असतानाच दुसरीकडे नीट पेपरफुटी प्रकरणातील प्रमुख आरोपीला मोठा दिलासा मिळाला आहे. केंद्रीय अन्वेषण ब्युरोने (सीबीआय) नीट-यूजी 2024 प्रश्नपत्रिका लीक प्रकरणासंदर्भात एका आरोपीला मोठा दिलासा आहे. सीबीआयने त्यांच्या तपासात संजीव कुमार उर्फ ​​संजीव मुखियाचा प्रश्नपत्रिकेच्या चोरीत किंवा वितरणात सहभाग असल्याचे समर्थन करणारा कोणताही पुरावा आढळला नसल्याचं म्हटलं आहे. 2024 मध्ये, बिहार पोलिसांनी नीट-यूजी प्रश्नपत्रिका चोरी उघडकीस आणली आणि या प्रकरणात एफआयआर दाखल केला. सीबीआयच्या म्हणण्यानुसार, तपासाच्या सुरुवातीच्या टप्प्यात, बिहार पोलिसांना सर्वप्रथम संजीव कुमार उर्फ ​​संजीव मुखिया यांच्यावर संशय आला होता. एजन्सीने सांगितले की, संजीव मुखिया यांचे नाव समोर आले कारण ते यापूर्वी इतर अनेक पेपर चोरी आणि गळती प्रकरणांमध्ये सामील असल्याचे आढळले होते. याच्या आधारावर, बिहार पोलिसांनी एफआयआरमध्ये त्यांचे नाव आरोपी म्हणून नमूद केले होते.

काय नेमकं प्रकरण? 

5 मे 2024 रोजी देशभरात नीट-यूजी परीक्षा झाली. सुमारे 23 लाख विद्यार्थ्यांनी भाग घेतला.

गैरप्रकार काय झाला? परीक्षेनंतर पेपर लीक, अनुचित साधनांचा वापर, काही केंद्रांवर (विशेषतः बिहारमधील पटना आणि झारखंडमधील हजारीबाग) प्रश्नपत्रिका फुटल्याचे आरोप झाले. काही विद्यार्थ्यांना आधीच उत्तर मिळाल्याचे दावे, ग्रेस मार्क्समुळे अनियमितता, अनेक टॉपर्स एकाच केंद्रावर येणे अशा अनेक तक्रारी आल्या.  सुप्रीम कोर्टाने पेपर लीक अस्वीकार्य असल्याचे मान्य केले. किमान 155 विद्यार्थ्यांना थेट फायदा झाल्याचे सांगितले.

शाळेचे प्रिन्सिपल, शिक्षक, दलाल, विद्यार्थी यांच्या विरोधात गुन्हे दाखल केले मात्र मुख्य आरोपी संजीव मुखिया सांगून अटक करण्यात आली होती, मात्र त्या विरोधात सीबीआयला पुरावा मिळाला नाही. म्हणूनच या प्रकरणात त्यांना जामीन मिळाला आहे.

अनेक परीक्षांचे पेपर फोडल्याचे आरोप

संजीव मुखिया हे पूर्वी नालंदा कॉलेजच्या नूरसराय शाखेत तांत्रिक सहाय्यक म्हणून काम केले होते. स्पर्धात्मक परीक्षांच्या पेपर लीक प्रकरणांमध्ये दीर्घ काळापासून संजीव मुखिया यांचे नाव अनेकदा समोर आले आहे. 2010 पासूनच्या अनेक घोटाळ्यांशी त्यांचे नाव जोडले गेले आहे, बिहार पोलिस कॉन्स्टेबल भरती परीक्षा, बीपीएससी शिक्षक भरती अगदी उत्तर प्रदेश आणि झारखंडसारख्या इतर राज्यांतील काही परीक्षांचे पेपर फोडण्यामध्येही संजीव मुखिया यांचा सहभाग असल्याचे आरोप झालेत. त्यांचा मुलगा डॉ. शिवकुमार (एमबीबीएस) देखील काही पेपर लीक प्रकरणांमध्ये तुरुंगात जाऊन आला आहे. संजीव मुखिया यांच्या पत्नीने 2020 मध्ये हरनौत मतदारसंघातून लोजपाच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती.

admin
Author: admin

और पढ़ें