Search
Close this search box.

Nashik Crime : आमच्यावर चार वेळा हल्ला केला, रॉड फेकून मारले, गाडीला लटकून खाली खेचण्याचा प्रयत्न, दगडही फेकले, पीडित महिलेने भावली परिसरातील हल्ल्याचा भयानक प्रसंग सांगितला

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

नाशिकच्या इगतपुरीमध्ये पर्यटकांवरती हल्ला झालेला होता. याच पर्यटकांनी त्यांच्यासोबत नेमकं काय घडलं याबाबतची सर्व घटना पत्रकार परिषद घेत याची माहिती दिली आहे. याबाबत महिलेने माहिती देताना सांगितलं की, आम्ही भावली धबधब्यावर परवा फिरायला गेलो होतो, 12 तारखेला आम्ही तिथं दोन अडीच वाजता पोहोचलो, आम्ही बिर्याणी वगैरे नेली होती, आम्ही जेवण वगैरे केलं. पाण्यात एन्जॉय केलं. मुलं पाण्यात खेळत होती, ते सगळं झालं त्याच्यानंतर मी चेंज करायला (Nashik Crime bhavli waterfall tourist attack) गेली, मला थंडी भरून आली होती आणि मागे दीर आणि नवरा पाठीमागून येत होते, तिथे जो छोटा ब्रिज आहे, भावली धरणाच्या इथला तिथे दोन जण टू-व्हीलरवर उभे होते, तिथून मी जात असताना त्यांनी शिट्टी वाजवली, त्यांनी कमेंट पास केली, मी ऐकल्यानंतर मी तिकडे जाऊन त्यांना एक दोन शिवी (Nashik Crime bhavli waterfall tourist attack) दिली की काय म्हटलं तुम्ही असं लेडीजला काहीही बोलता, तुम्हाला शोभत काय, एवढाच विषय तिथं झाला त्याच्यानंतर तो मला परत काहीतरी बोलला तर मी थोड इग्नोर केलं, माझा नवरा आणि दीर मागून आले. ते म्हणाले अरे तुम्हाला काही कळतं का नाही, काय करतो तू लेडीज आहे, असं बोलू नये, माझ्या नवऱ्याने त्याच्या डोक्यात असं मारलं तर तो घाबरून तिथून पळून गेला, अशी माहिती हल्ला झालेल्या पर्यटक महिलेनी दिली आहे.(Nashik Crime bhavli waterfall tourist attack)

Nashik Crime : आठ दहा मुलं उभे होते, तर त्यांनी पाहिलं आणि त्यांचा इगो हर्ट झाला

त्या पुढे म्हणाल्या की, त्याच्यानंतर त्याच्या बाजूला जी दुसरी गाडी होती, तिथं काही सामान विकत होते, तिथे आठ दहा मुलं उभे होते, तर त्यांनी पाहिलं आणि त्यांचा इगो हर्ट झाला की, आमच्या गावातल्या मुलाला तुम्ही काय दादागिरी करताय, आम्ही दादागिरी केलीच नाही, ना त्याला मारलं, काहीच नाही फक्त बोलणं झालं, त्याच्यानंतर पण हे लोक आमच्यावर धावून आले, अंगावर शिव्या गाळ करायला लागले, मग त्यांना शिवीगाळ केली तिथं थोडी आमची हातापायी झाली, तिथल्या पब्लिक लोकांनी आम्हाला वाचवलं, चला चला, सोडा सोडा, जा वगैरे, आम्ही तेवढं केलं तिथून आम्ही आमच्या गाडीत निघालो फक्त त्याच्यातला एक मुलगा आहे, त्याचं नाव नाही माहिती, पण त्यांनी असा इशारा करून गेला आम्हाला की, बघतो तुम्हाला पुढे असं, पण आम्हाला ते डोक्यात नाही आलं की, तो पुढे जाऊन आमच्यावर काय करेल, असंही त्यांनी म्हटलं.

Nashik Crime : मी त्यांना म्हणाले आवरा पटकन, गाडी काढा, त्यांना ते सुचना

तर तिथून निघाल्यावरचा थरारक प्रसंग सांगताना त्या म्हणाल्या की, आम्ही आमचं निघालो, मग आम्ही थोड भावलीच्या पुढे गेलो, पुढे गेल्यानंतर एक बलेनो आली फास्टमध्ये आणि त्यांनी आडवी लावली. रस्त्यात नाही लावली, आम्हाला तर जाता पण नसतं आलं, तो गाडीतून उतरला त्याने हाताने काचा फोडल्या, दोन्ही पुढच्या ड्रायव्हसीटच्या बाजूची आणि त्यांच्या मागची, पहिला वार तिथं केला, मी त्यांना म्हणाले आवरा पटकन, गाडी काढा, त्यांना ते सुचना, आता पहिल्यांदा ती गाडी चालवत होते, कशीतरी त्यांनी काढली. तिथं स्पीड ब्रेकर होता, त्यामुळं गाडी उडाली, आम्ही निघालो तिथून आणि नंतर मागे मुलं म्हणाली की, मम्मी अजून एक टू व्हीलर मागे येती आहे आपल्या तू ते बघ, व्हिडिओ काढ म्हटलं त्याला पटकन कोण आहे, कळेल तरी, त्यांच्याकडे रॉड होती, त्या व्हिडिओ पाहिलेच असेल, त्यांनी पहिले एक रॉड फेकली, दुसरी रॉड फेकली पण लागली नाही, त्याच्यानंतर ते परत मागे आले, पुढे जाऊन तशी आम्हालावट्रॅफिक लागलं, आमचा तिसरा स्पॉट टोल नाका होता, त्यांनी म्हणजे सुरुवातीपासून पहिला त्यांनी बाहुली डॅमपाशी अटॅक केला आमच्यावर, दुसरा नाशिक मुंबई हायवे फ्लायओव्हर तिथ दुसरा अटॅक झाला, तिसरा अटॅक गोटीचा टोल नाका आहे, त्यांनी आम्ही लेनमध्ये आलो, आमच्या पुढे दोन गाड्या होत्या, तर दोन गाड्या असल्यामुळे मला पास करता येणार नव्हता लगेच टोलनाका, ते माझ्या शेजारच्या लेनमध्ये आले आणि आमच्या अंगावर अटॅक करायला पळत होते, दगड घेऊन, आम्ही तिथून गाडी रिव्हर्स घेतली, त्यांनी परत दगड मारले, आम्ही चौथ्या लेनमधून बॅरिकेड तोडून पळालो होतो, आम्ही तोडून बॅरिकेट पाळालो, आम्ही फक्त जीव वाचवण्याचा प्रयत्न करत होतो, त्याच्या पुढं दोन चार किलोमीटर एक रस्ता शॉर्ट होतो, तिथे ट्रॅफिक असते नेहमी, तर तिथे येऊन त्यांनी परत आमच्यावर अटॅक केला, आमच्या गाडीच्या पुढे आले, आम्हाला ब्लॉक केलं, आम्ही पुढे नाही जाऊ शकणार अशा परिस्थिती, तिथं कशीतरी थोडी रिव्हर्स गाडी करून इगतपुरीच्या साईडला घेतली, म्हटलं आपण इगतपुरीला पळू, मुंबई साईडला, तर त्यांच्यातला एक मुलगा आमच्या गाडीला लटकला, तो 200 ते 500 मीटर आमच्या गाडीला लटकून होता, माझ्या चुलत भावाला खाली ओढण्याचा प्रयत्न करत होता, तर आम्ही गाडी पळवू पण नव्हतो शकत, जर हा गाडी खाली आला, तर आमच्याकडून एखाद्याचा बळी होईल आणि आम्ही थांबू शकत नव्हतो, की जर आम्ही थांबलो, तर आमचा बळी जाईल.

Nashik Crime : नाशिक साईडला पळालो, मग त्याच्यापुढे तो चौथा स्पॉट होता,

आमचा जीव धोक्यात असताना आम्ही त्याचे हात झटकत होतो की, हा गाडीतून पडावा म्हणजे लवकर निघा आणि आम्ही पळता यावं 100 ते 200 मीटरवर गेल्यावरती तो सुटला, तो खाली पडला, आम्ही इगतपुरी साईडला पळायला लागलो, पण मला आरश्यामध्ये दिसत होतं की, मागून बलेनो परत पाठलाग करत होती, म्हटलं आपण परत यांच्याच गावाकडे चुकीच्या ठिकाणी चाललोय, परत मी रिव्हर्स मारली म्हणजे टर्न मारून घेतला आणि नाशिक साईडला पळालो, मग त्याच्यापुढे तो चौथा स्पॉट होता, त्याच्यापुढे गोंदे दुमाला आहे तिथं जो फ्लायओवर छोटासा ब्रिज आहे,  तो काम चालू आहे, तिथं माझ्या पुढे दोन- चार ट्रक होत्या, तर मला काही पास करायला जागा नाही, पण ते शेजारून परत मागे आले आणि पुढे तर तिथं स्थानिक लोक भरपूर होते, मी सर्वांना रिक्वेस्ट केली, यांनी रडत होते की आम्हाला वाचवा, ते आम्हाला हे मारून टाकणार आहे,  त्यानंतर आम्ही तिथून अंबड पोलीस स्टेशन गाठले आणि तक्रार दाखल केली,” अशी माहिती हल्ला झालेल्या पर्यटकांनी दिली आहे.

Nashik Crime : भावली पर्यटक मारहाण प्रकरणी नऊ अटकेत 

भावली पर्यटक मारहाण प्रकरणी नऊ जणांनी अटक केली आहे. एक कुख्यात गुन्हेगार अद्याप फरार आहे, पालघर भागात पळाल्याने पोलीस मागावर आहेत. पर्यटक कुटुंबावर हल्ला केला होता, गाडीची तोडफोड केली होती. रात्रभर मागेवा घेत ग्रामीण पोलिसांनी अटक केली. पर्यटननगरी असलेल्या नाशिक जिल्ह्यात या हल्ल्यामुळे खळबळ माजली होती. व्हायरल व्हिडिओमुळे तातडीने पोलीस सक्रिय झाले.

admin
Author: admin

और पढ़ें