एकीकडे राज्यभरात भेसळी विरोधात कारवाई सुरू केली आहे. दूध भेसळीची अनेक प्रकरणे समोर आली आहे. या धाडसत्रांमुळे आता काही ठिकाणी दूध संकलन कमी झाल्याचे समोर आले आहे. दरम्यान, दूध संकलन आणि कथित फोन ऑडिओ क्लिप प्रकरणावरून राजकीय वातावरण तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी केलेल्या आरोपांना भाजपाचे आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी आक्रमक भाषेत प्रत्युत्तर दिले आहे. “माझ्या सहकारी दूध संघाचे दूध कमी झाले असेल तर थेट माझ्यावर गुन्हा दाखल करा,” असे जाहीर आव्हान देत धस यांनी पलटवार केला आहे. आमदार सुरेश धस म्हणाले, “माझ्या पत्नीने कोणालाही फोन केलेला नाही. आमचा कोणत्याही वर्तमानपत्राच्या संपादकाला किंवा दूध उत्पादक शेतकऱ्याला धमकावण्याशी दूरदूरपर्यंत काहीही संबंध नाही. माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर केले जाणारे सर्व आरोप पूर्णपणे बिनबुडाचे आहेत.” या सर्व आरोप प्रत्यारोपांवरती आता राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख (Mahebub Shaikh) यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
Mahebub Shaikh: जिनके किरदार मैले होते है, अक्सर वही लोग…
मेहबूब शेख यांनी म्हटलं आहे की, “काल भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी जयंत पाटील साहेबांच्या बद्दल काही वक्तव्य केलं. आणि ते वक्तव्य केल्यावर एक गोष्ट मला प्रकर्षाने जाणवली की, ‘जिनके किरदार मैले होते है, अक्सर वही लोग दुसरों के किरदार पर उंगलीया उठाते है.’ आमदार काय म्हणले जयंत पाटील साहेबाला? की त्यांना जेवढं देवाने बुद्धी दिली, त्याच्यापेक्षा आम्हाला जास्त दिली. खरं तर देवाने सगळ्यालाच बुद्धी दिली, पण त्या बुद्धीचा कसा वापर करायचा हा ज्याचा त्याचा नैतिकतेचा भाग आहे. जयंत पाटील साहेबांनी त्यांच्या बुद्धीचा वापर हा त्यांच्या मतदारसंघातल्या शेतकऱ्याच्या हितासाठी कारखाना उभारणीतून केला. विक्रमी ३-३.५ हजार रुपयाचा रेट हा १५ व्या दिवशी त्या शेतकऱ्याला मिळतो. तिथं संस्था चांगल्या उभा केल्या, ज्या संस्थेत किमान ३००-३५० देशातली लोकं येऊन वायवा मध्ये त्याठिकाणी शिक्षण घेतात. हे त्यांच्या बुद्धिमत्तेचा त्यांनी कसा वापर करायचा हे ठरवलं, असंही पुढे त्यांनी म्हटलं आहे.
Mahebub Shaikh: देवस्थानच्या जमिनी हडप करण्यासाठी डोक्याचा…
तर पुढे मेहबूब शेख म्हणाले, पण तुमच्यासारखी काही लोक बुद्धिमत्तेचा वापर काय करतात? तर आपल्या सोबत ९-९ वर्ष जीवावर उदार होऊन ज्या कार्यकर्त्यांनी काम केलं, त्या कार्यकर्त्यावर खोटे बलात्काराचे गुन्हे दाखल करून त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करण्यासाठी तुम्ही डोक्याचा वापर करता. देवस्थानच्या जमिनी हडप करण्यासाठी डोक्याचा वापर करता. शेवटी डोकं हे सगळ्याला दिलंय. पण वाळू चोऱ्या आणि देवस्थानच्या जमिनी लाटण्यासाठी कधी जयंत पाटील साहेबांनी डोक्याचा वापर केला नाही. बोलण्यासारखं भरपूर आहे. राज्यमंत्री पदाच्या काळात आदिवासी आणि देवस्थानच्या जमिनीच्या कशा ऑर्डरी झाल्या? मार्केट फेडरेशनच्या किती टक्क्यांनी पैसे गोळा केले गेले? आणि आताही नगरपंचायतचा घनकचरा देखील कसा पुरत नाही? ह्या बऱ्याच गोष्टी आहेत. अगदी बुट्ट्या गायकवाडच्या खून प्रकरणापासून मोठी यादी आहे. ‘बात निकली तो दूर तक जायेगी.’
Mahebub Shaikh: देवेंद्र फडणवीस जलसंपदा मंत्री असताना २० हजार कोटी….
जयंत पाटील साहेब काय म्हणाले? की दूध भेसळीमध्ये एका आमदाराच्या पत्नीने त्या ठिकाणी दम दिला, हे कोण? आता बीड जिल्ह्यात आमदार किती? ६. त्याच्यात एक महिला आमदार आहे. बाकी ५ आमदार आहेत. पाचही आमदारांचे लग्न झालेले आहेत, कोणीही बिगर लग्नाचा आमदार नाही. मग तुम्हालाच का मिरच्या बोंबल्या? त्यांनी तर कोणाचं नाव घेतलं नव्हतं. पण मिरच्या तुम्हालाच बोंबायचं कारण काय? आणि त्यांचं काय जीआरचं जे घेतलंय ऑनलाईनचं, तर त्या ऑनलाईनच्या जिओ टॅगच्या जीआर जे म्हणताय, त्याच्यावर देवेंद्र फडणवीस जलसंपदा मंत्री असताना २० हजार कोटी रुपयांचे टेंडर हे देवेंद्र फडणवीसांनी काढले. मग तुम्हाला म्हणायचं त्यांनी महाराष्ट्र लुटला? त्यावेळच्या जलसंधारण मंत्र्यांनी त्या जीआरवर आतापर्यंत जीआर त्याठिकाणी कामं काढली. त्यामुळं दूध भेसळ ही कोणी केली, त्या आमदाराच्या बायकोचं नाव समोर यायला नको? बुट्ट्या गायकवाडवर हल्ले झाले, त्याचा खून कसा झाला ते समोर यायला नको? मागच्या दोन-तीन महिन्यापूर्वी… एक ६-८ महिन्यापूर्वी प्रकाश आंबेडकर आले, एका आदिवासी महिलेला स्वतःची साडी काढून पळवायची वेळ कशामुळे आली? तर हे सगळंच पुढच्या अधिवेशनात काढू. तुम्ही जीआर काढा. तुम्हाला बोलता येतं, थोडं फार देवाने आम्हाला पण दिलंय, आम्हाला बोलता येतं. शेवटी एवढंच सांगतो, आंधळ्याने आरसा विकायचा नसतो आणि ज्याची जगणं खोटं आहे, त्यांनी सत्याचं भजन गायचं नसतं”, असंही पुढे त्यांनी म्हटलं आहे.








