Search
Close this search box.

पुढील काही तास धोक्याचे! मुंबईला मुसळधार पावसाचा तडाखा, पालिका सतर्क; मॅनहोलही उघडले

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

गेल्या 24 तासांपासून सुरु असणारा जोरदार पाऊस पाहता मुंबईत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईसह ठाण्यातही हवामान विभागाकडून पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

मुंबई, ठाणे, रायगड पालघरला हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट जारी. पुढील काही तास मुसळधार पावसाची शक्यता. मुंबईसह पश्चिम आणि पूर्व उपनगरात जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पावसाची शक्यता. पहाटेपासुन पावसाची संतधार बरसत असल्याचे पाहायला मिळत आहे. रेल्वे सेवेवरही पावसाचा परिणाम, अनेक लोकल 5 ते 10 मिनिटं उशिरानं धावत असून, रात्रभर कोसळणाऱ्या पावसामुळं नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. रस्ते वाहतुकीवरही मुंबईच्या पावसाचे परिणाम दिसू लागले आहेत.

सखल भागांमध्ये पाणी साचण्यास सुरुवात

मुंबईत रात्रभर पावसाची संततधार अन् काही भागांमध्ये मुसळधार पाऊस अंधेरी सबवे मधील वाहतूक पूर्णपणे ठप्प. शहरातील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचण्यास सुरुवात. बुधवारी रात्रीपासूनच संपूर्ण एमएमआर क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस पडत असून, गुरुवार 2 जुलैपासून पावसाचा जोर अधिकच वाढला. ज्यामुळं सायन, दादर, गांधी मार्केट इथं पावसाचा जोर वाढला. हा पाऊस असाच कायम राहिल्यास मुंबईकरांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

पावसामुळं पश्चिम लोकल मार्गावर अप आणि डाऊन दिशेने 10 ते 15 मिनिट उशिराने धावत आहेत, तसेच मध्य रेल्वे मार्गावर 10 ते 15 मिनिट उशिरा लोकल धावत आहेत. हार्बर मार्गावरील लोकल 5 ते 10 मिनिट उशिराने धावत आहेत.

.

मागील 24 तासांमध्ये मुंबई शहरात 100 मिमीपेक्षा अधिक पावसाची नोंद करण्यात आली, ज्यादरम्यान शहरातील अनेक भाग जलमय झाले. 2 जुलै रोजीसुद्धा शहराला पावसाचा तडाखा बसणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळं यादरम्यान शहरातील वाहतुकीचा वेग मंदावण्याची शक्यता वर्तवण्यात आलीआहे. पावसाचा हा इशारा पाहता पालिकेनं पाणी उपसा करणारी यंत्रणासुद्धा सज्ज ठेवली आहे.

दरम्यान, शहरातील पावसाचा वाढलेला जोर पाहता मुंबई महानगरपालिकेकडून 196 हा हेल्पलाईन क्रमांक जारी करण्यात आला आहे. महापौर रितू तावडे यांनीसुद्धा नागरिकांना गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचं आवाहन केलं आहे.

admin
Author: admin

और पढ़ें