Search
Close this search box.

‘मिशन टायगर’च्या यशानंतर शिंदेंचं ‘मिशन सेना भवन’? दादरऐवजी ‘इथं’ उभारणार आपलं हेडक्वार्टर?

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचं ‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी झालं आहे. ठाकरेंच्या शिवसेनेच्या सहा खासदारांनी शिंदेंच्या शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला असून मागील चार वर्षांमध्ये शिंदेंनी दुसऱ्यांदा ठाकरेंना धक्का दिला आहे. 2022 साली शिवसेनेमध्ये उभी फूट पडल्यानंतर पक्षाचं नाव आणि मूळ चिन्हावरील दावा सांगितल्यानंतर निवडणूक आयोगाने दोन्ही गोष्टी शिंदें गटाला दिल्यानंतर शिंदेंनी विधानसभा निवडणूक आणि लोकसभा निवडणुकीमध्ये समाधानकारक कामगिरी केली. मात्र त्यानंतर आता ठाकरेंच्या 9 पैकी 6 खासदार आपल्या पक्षात घेतलेत. आता शिंदेंकडून ठाकरेंच्या आमदारांना लक्ष्य केलं जाणार असल्याची चर्चा असतानाच दुसरीकडे शिंदेंकडून नवीन सेनाभवन उभारलं जाण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. यासाठी दोन जागांची चाचपणी सुरु असल्याची माहितीही मिळत आहे.

बंड झाल्यापासून दुसऱ्या शिवसेना भवनाची चर्चा

 

जून 2022 मध्ये शिवसेनेत फूट पडली. एकनाथ शिंदे यांनी बहुसंख्य आमदारांसह बंड केले आणि भाजपसोबत सरकार स्थापन केले. या गटाने आपणच ‘खरी शिवसेना’ असल्याचा दावा केला. निवडणूक आयोगानेही शिंदेंच्या गटाला पक्षाचं नाव आणि निवडणूक चिन्ह दिल्याने यावरुन सर्वोच्च न्यायालयामध्ये अजून खटला प्रलंबित स्थितीत सुरु आहे. एकीकडे पक्ष ताब्यात घेतल्यानंतर दुसरीकडे शिंदेंच्या शिवसेनेकडून शिवसेना भवनही उभारलं जाण्याची चर्चा सुरु झाली. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना गटाने दादरमध्ये मूळ शिवसेना भवन जवळच सुमारे 500 ते 600 मीटर अंतरावर, रुबी मिल तथा विस्टा सेंट्रल परिसरात नवीन, अधिक प्रशस्त शिवसेना भवन बांधण्याची योजना जाहीर केली होती. मात्र यासंदर्भात पुढे काही घडलं नाही. पण आता खासदार फोडल्यानंतर पुन्हा एकदा शिंदेंच्या शिवसेनेकडून शिवसेना भवनासंदर्भात चाचपणी सुरु असल्याच्या बातम्या समोर येत आहे.

कोणत्या दोन जागांची चाचपणी

शिंदेंच्या शिवसेनेकडून शिवसेना भवन उभारण्यासाठी दादरबरोबरच वांद्रे कुर्ला संकुल म्हणजेच बीकेसीमध्येही जागेची चाचपणी सुरु असल्याची चर्चा आहे. मात्र ही जागा दादर अथवा बिकेसीमध्ये नक्की कुठे असेल हे आताच सांगता येणार नाही.

खऱ्या शिवसेना भवनावर दावा सांगितलेला का?

दादरमधील मूळ शिवसेना भवन हे ट्रस्टच्या ताब्यात आहे, ज्यावर उद्धव ठाकरे गटाचं नियंत्रण आहे. त्यामुळे शिंदे गटाला हे शिवसेना भवन मिळणे कठीण आहे. 2022 मध्ये पक्षात उभी फूट पडल्यानंतर नवीन शिवसेना भवन शिंदेंच्या शिवसेनेकडून बांधण्याची चर्चा आणि बातम्या आल्या. नवीन इमारत अधिक मोठी आणि आधुनिक असणार, असे सांगितले जात होते. पण शिंदे गटाच्या नेत्यांनी या चर्चांना पूर्वविराम देताना स्पष्टीकरण दिलं.  ‘प्रति शिवसेना भवन’ बांधण्याची चर्चा ही गैरसमज आहे. शिंदेंना फक्त जनतेला भेटण्यासाठी मध्यवर्ती कार्यालय हवे आहे. फेब्रुवारीमध्ये निवडणूक आयोगाने शिंदे गटाला पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह दिले, पण त्यानंतरही शिंदेंच्या शिवसेनेनं मूळ शिवसेना भवनावर दावा न करण्याचे जाहीर केले.

सध्या दोन्ही पक्षांची कार्यालये कुठे आहेत?

सध्या दादरमधील मूळ शिवसेना भवन उद्धव ठाकरे गटाकडे आहे तर शिंदे गटाचे केंद्रीय कार्यालय ठाण्यात टेंभी नाका येथील आनंद आश्रममध्ये स्थापन झाले आहे. हे कार्यालय शिंदेंचे राजकीय गुरु आणि शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या जुन्या निवासस्थानी सुरु करण्यात आलं आहे.  मुंबईत नरीमन पॉईंट येथेही पत्रव्यवहारासाठी शिंदेंच्या शिवसेनेचं कार्यालय आहे. मंत्रालयासमोर बाळासाहेब भवनात हे कार्यालय आहे.

admin
Author: admin

और पढ़ें