Search
Close this search box.

ऑपरेशन टायगरच्या चर्चांदरम्यान संजय राऊतांची खळबळजनक पोस्ट; विमानतळावरचा फोटोच टाकला, आतापर्यंतचा मोठा दावा

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

नांदेड विमानतळावर एक चार्टड विमान उतरलं आणि ऑपरेशन टायगरच्या नावाखाली दोन खासदारांना घेऊन गेलं असा दावा ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. संजय राऊत यांनी एक्सवर विमानाचा फोटोही पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये चार्टर्ड विमान विमानतळावर उभं असल्याचं दिसत आहे. संजय राऊत यांनी यावेळी प्रत्येक गोष्टीचा हिशोब केला जाईल असा इशाराही दिला आहे. डरपोक कोल्ह्यांच्या पळवा पळविला

संजय राऊतांची पोस्ट

 

“नांदेड विमानतळावर एक चार्टड विमान उतरते. ऑपरेशन टायगरच्या नावाखाली दोन खासदारांना उचलून निघून जाते. यांची रिक्षात फिरण्याची औकात नव्हती. खासगी विमानाने फिरण्या एवढी किंमत ठाकरे नावामुळे वाढली, प्रत्येक गोष्टीचा हिशोब केला जाईल. डरपोक कोल्ह्यांच्या पळवा पळविला. टायगर का म्हणता?,” असा संताप संजय राऊतांनी व्यक्त केला आहे.

’50 हजारांचीही लायकी नाही; शिवसेनेच्या नावाचा आधार घेऊनच प्रसिद्धी मिळाली’

महुआ मोईत्रा यांच्या पोस्टवर व्यक्त होताना संजय राऊत यांनी या खासदारांची 50 हजारांचीही लायकी नसल्याचं म्हटलं आहे. त्यांनी दावा केला की, “उद्धव ठाकरे गटाच्या खासदारांना फक्त 15 कोटी रुपये नाही, तर 50 कोटी रुपये मिळत आहेत. प्रति खासदार 50 कोटी रुपये इतका ‘किमान आधारभूत भाव’ (MSP) निश्चित करण्यात आला आहे. म्हणजेच 50 ‘खोके’ ! ती 15 कोटींची रक्कम तर केवळ अ‍ॅडव्हान्स रक्कम आहे.”

admin
Author: admin

और पढ़ें