Search
Close this search box.

Pune IT Company : रातोरात कंपनीला ठोकले टाळे, लॅपटॉप डिपॉझिटसह 700 जणांचा पगार लाटला; ‘थिंकटेक’च्या मालकाला बेड्या, सीईओ ट्रेनिंग हेड, एचआरवर गुन्हे दाखल, नेमकं प्रकरण काय?

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

हिंजवडीतील कंपनीला रातोरात टाळे ठोकणाऱ्या मालकाला अखेर बेड्या ठोकण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. थिंकटेक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे मालक हर्षल ठाकरेने 700 आयटी अभियंत्यांची फसवणूक (Pune IT Company Closed Overnight)  केली होती. लॅपटॉपचे डिपॉझिट म्हणून घेतलेले 15 हजार आणि जानेवारी पासून पगार थकवत ठाकरे गायब झाला होता. याप्रकरणी हिंजवडी (Pune IT Company Closed Overnight)  पोलिसांकडे 21 मे ला आयटी अभियंत्यांनी तक्रार दिली होती. मात्र पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यासाठी टाळाटाळ केली गेली.(Pune IT Company Closed Overnight)

Pune IT Company Closed Overnight: सीईओ, ट्रेनिंग हेड, एचआरसह काहींवर गुन्हा दाखल

हे सर्व प्रकरण माध्यमांनी समोर आणले. तेव्हा आम्ही हर्षल ठाकरेचा शोध घेतोय, असं तकलादू उत्तर पोलिसांनी दिलं. मात्र प्रत्यक्षात ठाकरेचा फोन सुरु होता, पोलीस त्याला अटकेपासून संरक्षण देत असल्याचं माध्यमांनी समोर आणलं. मग तोंडघशी पडलेल्या हिंजवडी पोलिसांना जाग आली. त्यांनी कंपनी सीईओ हर्षल ठाकरे, ट्रेनिंग ऍण्ड डेव्हलपमेंट हेड ध्रुवील पारेख आणि एचआर सौम्या सिंग यांच्यासह कंपनीतील इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र आयटी अभियंते तक्रार द्यायला उशीरा आले, असं फिर्यादीत नमूद केलं.

Pune IT Company Closed Overnight: 700 आयटी अभियंत्यांकडून 15 हजार प्रमाणे घेतलेलं डिपॉझिट अन् पगार

स्वतःच्या बचावासाठी हिंजवडी पोलिसांनी आधीचं फसवणूक झालेल्या आयटी अभियंत्यांवर यानिमित्ताने पुन्हा दबाव आणल्याचं उघड झालं. शिवाय केवळ 11 लाख 25 हजारांची फसवणूक केल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. 700 आयटी अभियंत्यांकडून 15 हजार प्रमाणे घेतलेलं डिपॉझिट आणि जानेवारी पासून थकवलेला पगार हा आकडा कोट्यवधींच्या घरात जाणं अपेक्षित आहे. मात्र पोलिसांकडून गुन्ह्यांची तीव्रता कमी करण्याचा खटाटोप सुरु असल्याचं दिसतंय. आधीचं गुन्हा दाखल करायला उशीर करणारे पोलीस तपासात असा कुचकामीपणा करणार नाहीत ना? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. आता बेड्या ठोकलेल्या हर्षल ठाकरेची पोलिसांनी कसून चौकशी करावी आणि बेरोजगार झालेल्या 700 आयटी अभियंत्यांचं किमान आर्थिक नुकसान तरी भरुन द्यावं. म्हणजे पोलिसांवर उपस्थित सर्व प्रश्नांची उत्तरं समाजाला मिळतील.

तपासादरम्यान कंपनीच्या आर्थिक व्यवहारांची आणि कर्मचाऱ्यांकडून जमा करण्यात आलेल्या डिपॉझिट रकमेची सखोल चौकशी होण्याची शक्यता आहे. कंपनीच्या खात्यांमधील व्यवहार, संबंधित अधिकाऱ्यांची भूमिका तसेच कर्मचाऱ्यांची दिशाभूल करण्यात आली होती का, याचाही तपास केला जाणार आहे. या प्रकरणात आणखी काही आरोपींची नावे समोर येण्याची शक्यता वर्तवली जात असून आर्थिक गुन्हे शाखेची मदतही घेतली जाऊ शकते.

हर्षल ठाकरेच्या अटकेनंतर फसवणुकीला बळी पडलेल्या आयटी अभियंत्यांमध्ये काही प्रमाणात समाधान व्यक्त केले जात असले, तरी त्यांची आर्थिक नुकसानभरपाई आणि थकीत पगाराचा प्रश्न अद्याप कायम आहे. त्यामुळे केवळ आरोपींवर कारवाई करून न थांबता कर्मचाऱ्यांचे पैसे परत मिळवून देण्यासाठीही यंत्रणांनी प्रयत्न करावेत, अशी मागणी पीडित कर्मचाऱ्यांकडून केली जात आहे. आता या प्रकरणाच्या तपासातून नेमका आर्थिक घोटाळा किती मोठा आहे आणि आणखी कोणाचा सहभाग आहे, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

admin
Author: admin

और पढ़ें