Search
Close this search box.

Surat Bardoli Bus Accident : जोरदार धडकेनंतर बस पलटली अन् आग लागली, सात जणांचा होरपळून मृत्यू, ST महामंडळाच्या दोन बसचा भीषण अपघात

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

गुजरात मधील सुरत (Surat) जिल्ह्यातून एक अत्यंत थरकाप उडवणारी आणि भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. सुरत जिल्ह्यातील बार्डोली जवळून जाणाऱ्या धुळे हायवेवर (Dhule Highway) महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या (MSRTC) दोन एसटी बसचा अत्यंत भीषण अपघात झाला आहे. हा अपघात इतका भयानक होता की, धडकेनंतर एक एसटी बस थेट महामार्गावर उलटली आणि क्षणार्धात बसला भीषण आग लागली. या आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने 7 प्रवाशांचा जागीच होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला असून मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

अपघातात बळी पडलेल्या महाराष्ट्र परिवहन मंडळाच्या दोन्ही बसचे क्रमांक MH-18-BZ-1258 आणि MH-20-BL-3390 असे आहेत. जोरदार टक्कर होताच एक बस हायवेवर पलटी झाली आणि एका मोठ्या धमाक्यासह पेट घेतला. आग इतकी वेगाने पसरली की आतील प्रवाशांना बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही.

Uva Manekpor Village Accident : बस उलटल्यानंतर मोठा धमाका झाला

स्थानिक प्रशासनाकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, हा भीषण अपघात बारडोली तालुक्यातील उवा आणि मानेकपोर गावाच्या दरम्यान झाला. महाराष्ट्र डेपोची एक एसटी बस धुळ्याहून नवापूर मार्गे सुरतच्या दिशेने जात होती. याच दरम्यान समोरून येणाऱ्या दुसऱ्या एसटी बसची तिच्यासोबत जोरदार धडक झाली.

Bardoli Fire Brigade Action : अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी दाखल

या भयानक अपघाताची माहिती मिळताच बार्डोली अग्निशमन दलाचे (Fire Team) जवान आणि स्थानिक पोलीस प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी तातडीने रुग्णवाहिकांसह घटनास्थळी दाखल झाले. अग्निशामक दलाच्या जवानांनी अथक प्रयत्नांनंतर बसला लागलेली आग आटोक्यात आणली. पोलिसांनी तात्काळ मदतकार्य सुरू करत बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढले.

Gujarat Post Mortem Update : मृतदेह शवविच्छेदनासाठी रवाना

अपघातात होरपळलेल्या प्रवाशांपैकी सात जणांचा मृत्यू झाला असून, यातील सहा मृतदेह घटनास्थळावरून ताब्यात घेऊन ते अत्यंत काळजीपूर्वक बार्डोलीच्या रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. या अपघातात अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या भीषण अपघातामुळे धुळे-सुरत हायवेवर दोन्ही बाजूंनी अनेक किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून प्रचंड वाहतूक कोंडी (Traffic Jam) निर्माण झाली आहे. पोलीस सध्या हायवेवरील अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक पूर्ववत करण्याचे प्रयत्न करत आहेत.

admin
Author: admin

और पढ़ें