Search
Close this search box.

मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; डिव्हायडरला आदळून कारचा चेंदामेंदा, पत्रा कापून काढलं बाहेर, 2 जागीच ठार

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात झाला आहे. मुंबईकडून पुण्याकडे येणाऱ्या लेनवर हा अपघात झाला आहे. चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. अपघात इतका भीषण होता की, गाडीचा दरवाजा आणि पत्रे कापून गंभीर जखमी आणि मृत्यू झालेल्यांना बाहेर काढण्यात आलं. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

नेमकं काय झालं? 

अपघातग्रस्त गाडीमध्ये एकूण तिघेजण होते. चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने कार डिव्हायडरला जाऊन धडकली. डिव्हायडरचा पत्रा हा थेट गाडीमध्ये घुसल्याने गाडीत असलेले 2 जण जागीच ठार झाले. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी आयआरबी यंत्रणा, पोलीस व रुग्णवाहिका दाखल झाल्या. गाडीचे दरवाजे व पत्रा कापून गंभीर जखमी व मयत झालेल्यांना बाहेर काढण्यात आले. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

admin
Author: admin

और पढ़ें