Search
Close this search box.

Palghar Accident News: पालघरमध्ये भीषण अपघात! मुंबई-बडोदा एक्सप्रेसवेच्या पुलाला हायवा ट्रकची जोरदार धडक, चालक गंभीर

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

Palghar Accident News: पालघरमध्ये भीषण अपघात! मुंबई-बडोदा एक्सप्रेसवेच्या पुलाला हायवा ट्रकची जोरदार धडक, चालक गंभीर पुलाखालून जात असताना भरधाव वेगाने असलेल्या एका हायवा ट्रकने पुलाच्या बांधकामाला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात हायवा ट्रकचा चालक गंभीर जखमी झाला आहे. त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या महामार्गाचे काम आता अंतिम टप्प्यात असून लवकरच तो वाहतुकीसाठी खुला होणार आहे. हा महामार्ग पूर्ण होण्यापूर्वीच गेल्या केवळ दोन महिन्यांत या परिसरात घडलेला हा चौथा अपघात आहे. वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे या महामार्गावरील सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत स्थानिक नागरिक आणि प्रवाशांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. महामार्गाचे काम सुरू असताना अवजड वाहनांच्या वेगावर कोणाचेही नियंत्रण नसल्याचे या घटनेवरून स्पष्ट झाले आहे. या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघात नेमका कसा झाला? याबाबत पोलीस तपास करत आहेत.

admin
Author: admin

और पढ़ें