Search
Close this search box.

Ashok Kharat Case:’केबल टेस्टरने अल्पवयीन मुलीला…’ भोंदूबाबाचं नवं कांड उघड, नेमकं काय घडलं?

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

नाशिकमधील स्वयंघोषित ज्योतिषी अशोक खरात प्रकरणाने सध्या संपूर्ण राज्यात खळबळ उडवली आहे. महिलांवर अत्याचार केल्याच्या आरोपांमुळे अटक झाल्यानंतर या प्रकरणातील धक्कादायक तपशील एकानंतर एक समोर येत आहेत. सुरुवातीला काही व्हिडीओ समोर आल्यानंतर या प्रकरणाची गंभीरता वाढली, मात्र आता उघड होत असलेली माहिती आणखीच हादरवणारी ठरत आहे. अंधश्रद्धा, फसवणूक आणि महिलांचे शोषणच्या या घटनांमुळे संतापाची लाट उसळली आहे. अलीकडेच या भोंदूबाबचं नवं कांड समोर आलं असून यामध्ये ऑफिस बॉय नीरज जाधवबाबतही मोठी अपडेट समोर आली आहे.

‘अशोक खरात’चे धक्कादायक प्रयोग उघड

तपासादरम्यान ‘अशोक खरात’ याने महिलांना आपल्या जाळ्यात अडकवण्यासाठी विविध पद्धती वापरल्याचे समोर आले आहे. उपचाराच्या नावाखाली तो महिलांना बोलावून त्यांचा गैरफायदा घेत असल्याचे आरोप आहेत. विशेष म्हणजे, या सर्व घटनांचे व्हिडीओ त्याने तयार केल्याचेही उघड झाले असून 58 पेक्षा जास्त क्लिप्स समोर आल्या आहेत.

 

केबल टेस्टरने मुलीच्या पोटावर…

या प्रकरणात आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. ‘अशोक खरात’ महिलांवर उपचार करत असल्याचा बहाणा करून ‘केबल टेस्टर’सारख्या उपकरणांचा वापर करत असे. अशा प्रकारे तो अघोरी उपचाराचा आव आणून लोकांची दिशाभूल करत होता. एका अल्पवयीन मुलीवर अशाच प्रकारे उपचार केल्याचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणाला गंभीर वळण मिळाले आहे.

व्हिडीओमुळे वाढला वाद

समोर आलेल्या फुटेजमध्ये ‘अशोक खरात’ एका मुलीच्या पोटावर उपकरण लावून उपचार केल्याचा बहाणा करत असल्याचे दिसते. तो वारंवार पोटाला हात लावत असल्याचेही दिसत आहे. या प्रकारामुळे अंधश्रद्धेचा गैरफायदा घेत लोकांची फसवणूक होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

‘नीरज जाधव’ची भूमिकाही संशयात

या प्रकरणात ‘नीरज जाधव’ नावाच्या व्यक्तीचीही भूमिका समोर आली आहे. तो ‘अशोक खरात’चा ऑफिसबॉय असल्याचे सांगितले जाते. त्याने काही व्हिडीओ मिळवून ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केल्याचे तपासात उघड झाले आहे. तसेच त्याने पीडित महिलांना धमकावल्याचेही समोर आले आहे.

सध्या ‘अशोक खरात’ला 24 मार्चपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली असून तपास वेगाने सुरू आहे. ‘नीरज जाधव’लाही अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात आणखी पीडित महिला समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, पुढील काळात आणखी धक्कादायक माहिती उघड होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

admin
Author: admin

और पढ़ें