Search
Close this search box.

5 मिनिटांत 13 लाख कोटी रुपये स्वाहा; Share Market Crash मुळं पैशांची राखरांगोळी

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

इराण- इस्रायल युद्धाचा परिणाम संपूर्ण जगावर होत असातनाच भारतीय शेअर बाजारातही याचे थेट परिणाम दिसून आले. सलग दुसऱ्या आठवड्यात सुरु असणाऱ्या युद्धादरम्यान सोमवार 9 मार्च 2026 रोजी शेअर बाजाराचा कारभार सुरू झाला त्यावेळी आठवड्याया पहिला दिवस अतिशय वाईट आकड्यांनीच सुरू झाला. जितं मुंबई शेअर बाजारात सेन्सेक्स 2400 हून अधिक अंकानी कोसळला तिथं निफ्टीसुद्धा 700 अंकांहून अधिक खाली आहा. ज्यामुळं पाच मिनिटांच्या कारभारातच गुंतवणूकदारांचे तब्बल 13 लाख कोटी रुपये स्वाहा झाले.

मुंबई स्टॉक एक्सचेंजमध्ये लिस्टेड कंपन्यांचा कारभार BSE MCap कोसळून जवळपास 439 लाख कोटी रुपयांवर पोहोचला. सोमवारी शेअर बाजार सुरू झाल्याक्षणीच निफ्टी आणि सेन्सेक्स कोलमडला. BSE Sensex मागील दिवसाच्या बंद 78,918.90 च्या तुलनेत घसरून 77,056.75 वर पोहोचला. तर, निफ्टी 24,450 वरुन 23,868 वर पोहोचला.

पाच मिनिटांच्या वेळेतच इतकं मोठं नुकसान पाहता गुंतवणूकदारांच्या मोठ्या रकमेची राखरांगोळी झाल्याचं पाहायला मिळत आहे. सोमवारी सुरुवातीच्या सत्रातच शेअर बाजार 436 लाख कोटींहून खाली आल्यामुळं आकडेमोड केल्यास गुंतवणुकदारांच्या 13 लाख कोटी रुपयांवर पाणी सोडावं लागल्याचं स्पष्ट झालं.

कच्च्या तेल्यांच्या किमतींनी तेल कंपन्या भस्म

शेअर बाजाराच्या या पडझडीमागे सर्वात मुख्य कारण म्हणजे अमेरिका इस्रायल- इराण यांच्यातील युद्धाची ठिणगी आणि त्याचा कच्च्या तेलाच्या दरावर होणारा परिणाम सांगण्यात येत आहे. तेलदरांमध्ये प्रचंड वाढ झाली असून, 2022 नंतर पहिल्यांदाच हे दर 100 डॉलर प्रति बॅरल इतका दर ओलांडताना दिसले. ज्यामुळं तेल कंपन्यांच्या शेअरवरही याचा परिणाम दिसून आला जिथं त्यांची 7 ते 9 टक्क्यांनी घसरण झाली. शेअर बाजारातील ही आकडेवारी आणि येत्या काळात सामान्य माणसाच्या पैशांवर होणारा परिणाम पाहता ही आर्थिक घसरण कधी थांबणार हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

admin
Author: admin

और पढ़ें