Search
Close this search box.

आधी 60 रुपयांनी दर वाढवले अन् आता Gas Cylinder Booking चा Waiting Period वाढला

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

 इस्रायल आणि इराणदरम्यान सुरु असलेल्या युद्धामुळे भारतामध्ये गॅस संकट दिवसोंदिवस अधिक गंभीर होत असल्याचं पाहायला मिळत आहे. युद्धामुळे आखाती देशांमधून भारताला होणारा नैसर्गिक वायू पुरवठा प्रभावित झाला आहे. त्यामुळे सरकारने घरगुती गॅस सिलिंडरचे दर वाढवण्यासोबतच एक मोठा निर्णय घेतला आहे. गॅसची संभाव्य वाढती चणचण पाहून गॅस सिलिंडर नोंदणीचा कालावधी वाढण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या निर्देशानुसार आता एक सिलिंडर प्राप्त झाल्यानंतर दुसरा सिलिंडर 25 दिवसांनीच नोंदवता येणार आहे.

किती दिवसांनी वाढला कालावधी?

इराणने कतारमध्ये हल्ले केल्यामुळे सुमारे 30 टक्के वायू पुरवठा कमी झाला आहे. त्यामुळे केंद्र सरकारने गॅस वितरक कंपन्यांना घरगुती गॅस सिलिंडर महिनाभरातून एकच देण्याबाबत सूचना दिल्या आहेत. अचानक घेण्यात जालेल्या या निर्णयांनी नागरिकांमध्ये गोधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक घरांमध्ये दोन गॅस सिलिंडर असतात, गॅस नोंदणी केल्यानंतर साधारणतः दोन ते चार दिवसांनी सिलिंडर घरपोच मिळायचा, त्यानंतर दुसन्या मिलिंडरची नोंदणी 15 दिवसांनी करता येत होती. आता हा कालावधी 10 दिवसांनी वाढला आहे.

 

केव्हायसीसंदर्भातही एक मोठा निर्णय

केव्हायसीसंदर्भातही एक मोठा निर्णय झाला आहे. गॅस कंपनी आणि डिलर यांच्यात झालेल्या ऑनलाईन बैठकीमध्ये केवायसी न केलेल्या ग्राहकांना घरगुती गॅस सिलिंडर न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दोन सिलिंडरमधील अंतर 21 दिवसांवरून 30 दिवसांवर करण्यात आलं असून यामध्ये आठ दिवसांची वाढ करण्यात आली आहे.  याची अंमलबजावणी सुरु करण्यात आली आहे  अनेक ग्राहकांचे केवायसी प्रलंबित आहेत. इराण-इस्राय युद्धामुळे पुरठवण्यावर परिणाम झाल्याने वितरकांकडे गॅसचा साठा कमी आहे.  त्यामुळे घरगुती गॅसची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. नागरिकांनी गॅस काटकसरीने वापरण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

ओटीपी पद्धतीचा वापर

गॅस वितरणात पारदर्शकता ठेवण्यासाठी ओटीपी प्रणाली लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सिलेंडर वितरण करताना ग्राहकांना ओटीपी सांगणे आवश्यक राहणार आहे. यामुळे बोगस ग्राहक किंवा गैरवापर ओळखणे सोपे होईल, असे कंपन्यांचे म्हणणे आहे.

काही दिवसांपूर्वीच झालीये दरवाढ

एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत 60 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. तेल विपणन कंपन्यांनी आंतरराष्ट्रीय ऊर्जा बाजारातील वाढत्या किमतींचा परिणाम लक्षात घेऊन हा निर्णय घेतला आहे. नवीन दर 7 मार्चपासून लागू झाले आहेत. या दरवाढीनंतर 14.2 किलो नॉन-सब्सिडी एलपीजी सिलिंडरची किंमत दिल्लीमध्ये 913 रुपये इतकी झाली आहे. इतर प्रमुख शहरांमध्येही सिलिंडरच्या किमती वाढल्या असून मुंबईमध्ये 912.50  रुपये, कोलकातामध्ये 939  रुपये आणि चेन्नईमध्ये 928.50  रुपये इतके दर झाले आहेत. राज्यागणिक स्थानिक कर आणि व्हॅटमुळे किमतींमध्ये थोडा फरक असू शकतो.

admin
Author: admin

और पढ़ें