Search
Close this search box.

February 12 Bharat Bandh: 12 फेब्रुवारीला भारत बंद! शाळा, कॉलेजना सुट्टी? बँकाही बंद राहणार? बस, रेल्वे, मेट्रो सेवेवर काय परिणाम होणार?

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

12 फेब्रुवारी रोजी भारतात देशव्यापी संपाची हाक देण्यात आली आहे. देशभरात बंद पाळला जाणार आहे. प्रमुख केंद्रीय कामगार संघटनांनी हा बंद पुकारला आहे. शेतकरी संघटना आणि अनेक कर्मचारी संघटनांनीही याला पाठिंबा दर्शविला आहे. परिणामी, 12 फेब्रुवारीला अनेक राज्यांमध्ये बँकिंग सेवा, सार्वजनिक वाहतूक, सरकारी कार्यालये आणि औद्योगिक कारखाने बंद राहू शकतात. तसेच शाळा आणि महाविद्यालांना देखील सुट्टी मिळू शकते.

12 फेब्रुवारीला भारत बंद दिवशी कोणत्या सेवा सुरु राहतील?

12 फेब्रुवारी रोजी भारत बंद आहे, परंतु काही सेवा सामान्यपणे सुरू राहतील.
रुग्णालये आणि आपत्कालीन सेवा
रुग्णवाहिका सेवा
मेडिकल स्टोअर
अग्निशमन दल आणि मदत सेवा
दूध पुरवठा
वर्तमानपत्र वितरण
विमानतळ आणि विमान सेवा
एटीएम

12 फेब्रुवारीला भारत बंद का आहे? 

12 फेब्रुवारी संप प्रामुख्याने केंद्र सरकारने लागू केलेल्या चार नवीन कामगार कायद्यांच्या निषेधार्थ आहे. कामगार संघटनांचे म्हणणे आहे की हे कायदे कंपन्यांना जास्त फायदे देतात आणि कामगारांसाठी संरक्षण कमी करतात. त्यांचा आरोप आहे की या बदलांमुळे कंपन्यांना कर्मचाऱ्यांना काढून टाकणे सोपे होईल आणि सामूहिक सौदेबाजीचे अधिकार कमकुवत होतील. शेतकरी संघटनांनीही या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. काही गटांनी आर्थिक धोरणे आणि व्यापार करारांबद्दल चिंता व्यक्त केली आहे, ज्याचा परिणाम लहान शेतकरी आणि कामगारांवर होऊ शकतो असे त्यांचे म्हणणे आहे.

admin
Author: admin

और पढ़ें