मालेगावमधील आजचा दिवस हा महापौर निवडीमुळे चर्चेत होता. मालेगावच्या महापौरपदी इस्लामच्या नसरीन बानो शेख यांची निवड झालीये. पण महापौर निवड झाल्यानंतर येथे एक विचित्र घटना घडली. पालिकेची लिफ्टमध्ये गर्दी झाली आणि ती लिफ्ट मध्येच अडकली. यामध्ये सर्व पक्षीय नेते, कार्यकर्ते आणि माध्यमकर्मीदेखील होते.
मालेगावात महापौर निवडणुकीनंतर मोठी दुर्घटना घडली. मनपा सभागृहातील लिफ्ट कोसळली.ओव्हरलोड झाल्यामुळे लिफ्ट कोसळली. या घटनेत नगरसेवक आणि पत्रकार किरकोळ जखमी झाले आहेत.
निवडणूक संपल्यानंतर सर्वजण आनंदाच्या भरात होते. अनेक लोक निवडून आलेल्यांना शुभेच्छा देण्यासाठी जमा होते. सुरुवातीला दरवाजा बंद झाला नाही. तसेच लिफ्टमधून 2 वेळा आवाजदेखील आला. लिफ्टच्या तारादेखील तुटलेल्या होत्या. त्यात हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते जमले होते. महापौर निवड झाल्याने माध्यम प्रतिनिधीदेखील लिफ्टमध्ये होते. पण सुदैवाने मोठी दुर्घटना घडली नाही. यामध्ये झी 24 तासचे प्रतिनिधी विशाल मोरे किरकोळ जखमी झाले. या लिफ्टची देखभाल डागडुजी झाली नव्हती, यामुळे घटना घडल्याचे म्हटले जात आहे.
लिफ्ट ओव्हरलोड झाल्याने ती अर्धवट अडकली. लिफ्ट जर आदळली असती तर त्यातून स्फोट होण्याचीदेखील शक्यता होती. पण सुदैवाने असं काही झालं नाही. लिफ्टमधील सर्वांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलंय.
महापौरपदी नसरीन बानो शेख
मालेगावच्या महापौरपदी इस्लामच्या नसरीन बानो शेख यांची निवड झालीये. नसरीन बानो यांना 43 मतं मिळाली आहेत. तर विरोधातील शिवसेनेच्या उमेदवार लता घोडके यांना 18 मतं मिळाली आहेत. इस्लामच्या 35,समाजवादीच्या 5 तर काँग्रेसच्या 3 अशा एकूण 43 नगरसेवकांनी केले नसरीन बानो शेख यांना मतदान केलंय. तर उपमहापौरपदी समाजवादी पार्टीच्या शान ए हिंद विजयी झाल्या आहेत. सपाच्या शान ए हिंद यांना 43 मतं मिळाली आहेत.







