Search
Close this search box.

अजय देवगण म्हणाला, RSS ला 100 वर्षे पूर्ण, राष्ट्र निर्माणमध्ये संघाचं मोठं योगदान; ‘शतक’ सिनेमाचा टीझर शेअर

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) स्थापनेच्या शंभर वर्षांच्या निमित्ताने तयार करण्यात आलेल्या ‘शतक : संघाचे १०० वर्ष’ या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला. संघाची शंभर वर्षांची वाटचाल, त्यांची विचारधारा आणि सामाजिक योगदान असलेला हा चित्रपट आहे. गतवर्षी म्हणजे 2025 मध्ये RSS ने आपल्या स्थापनेची शताब्दी पूर्ण केली. या ऐतिहासिक टप्प्याच्या पार्श्वभूमीवर ‘शतक’ हा चित्रपट साकारण्यात आला आहे. दिल्लीतील RSS च्या केशव कुंज कार्यालयात या चित्रपटातील ‘भगवा है अपनी पहचान’ या गीताचे लोकार्पण सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते करण्यात आले होते. आता, बॉलिवूडचा सिंघम अजय देवगणने (Ajay Devgan) या चित्रपटाचा टिझर आपल्या सोशल मिडिया अकाऊंटवरुन शेअर करत संघाच्या योगदानाबद्दल माहिती दिली.

https://x.com/ajaydevgn/status/2018689427820958189?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E2018689427820958189%7Ctwgr%5Ea797c262f7a449e3c5c840fa87c63add458b8611%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fmarathi.abplive.com%2Fentertainment%2Fbollywood%2Fajay-devgan-said-rss-completes-100-years-rashtra-nirman-sangh-is-a-big-contribution-share-the-teaser-of-the-film-shatak-1411262

ये कहाणी है उस विचार की, जिसे कई साल कई बार मिटाने की कोशिश की गई… असे म्हणत या टिझरमध्ये आरएसएस संघटनेच्या कार्यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. त्यामध्ये, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावकर आणि महात्मा गांधींच्याही भूमिका पाहायला मिळतात. आता, या चित्रपटाचा टिझर अजय देवगणने आपल्या अकाऊंटवरुन शेअर केला आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल अभिनंदन, या शतकी वर्षांच्या कार्यकाळात राष्ट्र निर्माण करण्यात संघाचे मोठं योगदान आहे. RSS च्या याच योगदानावर प्रकाश टाकण्यासाठी नवा चित्रपट येतोय, शतक! असे म्हणत अभिनेता अजय देवगणने चित्रपटाचा ट्रेलर आपल्या सोशल मिडिया अकाऊंटवरुन शेअर केला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक आशीष मल्ल यांनी केले असून निर्माते वीर कपूर आहेत. ”हा चित्रपट माझ्यासाठी एका वैयक्तिक प्रवासासारखा आहे. चित्रपटाशी संघाशी संबंधित असे अनेक पैलू समोर आले, ज्यांवर सहसा चर्चा होत नाही. समाजात पसरलेल्या गैरसमजांना प्रामाणिकपणे समोर आणणे हेच आमचे प्रमुख उद्दिष्ट होते, असे दिग्दर्शक मल्ल यांनी म्हटले.

दरम्यान, 1875 ते 1950 या काळात सुरू झालेल्या अनेक चळवळींपैकी संघ ही एकमेव संघटना आहे जी अखंडपणे पुढे जात राहिली, हीच त्याची सर्वात मोठी ताकद आहे. ‘ना रुके, ना थके, ना झुके’ ही चित्रपटाची टॅगलाईन याच भावनेचे प्रतीक असल्याचे निर्मात्यांनी म्हटले आहे.

admin
Author: admin

और पढ़ें