Search
Close this search box.

SHOKCING! 25 वर्षीय अभिनेत्रीची राहत्या घरी हत्या; प्रियकराला बेड्या!

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

कलाविश्वाला हादहरवणारं वृत्त नुकतंच समोर आलं असून, यामध्ये 25 वर्षीय अभिनेत्रीची तिच्या राहत्या घरी हत्या केल्याच्या घटनेनं यंत्रणांनाही हादरा मिळाला आहे.

‘ब्रॉडवे’ फेम अभिनेत्री इमानी डिया स्मिथ असं या अभिनेत्रीचं नाव असून, चाकूनं भोसकून अतिशय निर्घृणपणे हत्या करण्यात आली. ‘द लायन किंग’च्या स्टेज वर्जनमध्ये या अभिनेत्रीनं तरुण नालाची भूमिका साकारत लोकप्रियता मिळवली होती. प्राथमिक माहितीनुसार 21 डिसेंबरला न्यू जर्सी इथं असणाऱ्या घरी तिचा मृतदेह अतिशय धक्कादायक स्थितीत आढळून आला. ज्यामध्ये तिच्या शरीरावर सपासप वार केल्याचं पाहायला मिळालं. स्थानिक आपात्कालीन क्रमांक 911 वर या घटनेची माहिती मिळाली.

न्यू जर्सीच्या काऊंटी कार्यालयाकडून जारी करण्यात आलेल्या एका परिपत्रकातून दिलेल्या माहितीनुसार, ’21 डिसेंबर 2025ला सकाळी 9.18 वाजता अधिकाऱ्यांना या गुन्ह्याची माहिती देणारा फोन 911 या क्रमांकावर आला. अभिनेत्रीच्या ग्रोव अवेन्यूस्थित घरी पोहोचलं असता रक्ताच्या शरीरावर वार झालेल्य़ा अवस्थेत तिचा मृतदेह आढळला. ज्यानंतर तिला रॉबर्ट वुड जॉनसन विद्यापीठ रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र तिथं डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं.’

काही आंतरराष्ट्रीय माध्यमांच्या वृत्तानुसार इमानीच्या 35 वर्षीय प्रियकराला याप्रकरणी अटक करण्यात आली असून, डी जॅक्सन स्मॉल असं त्याचं नाव. इमानी आणि जॅक्सन स्मॉल या घटनेपूर्वीपासून एकमेकांच्या संपर्कात असल्यानं ही हिंसाचाराची अकस्मात घटना नसल्याचं तपास यंत्रणांचं म्हणणं आहे. प्रारंभिक तपासानुसार स्थानिक पोलिसांकडून अभिनेत्रीच्या प्रियकरावर अनेक गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.

3 वर्षांच्या मुलाची आई होती इमानी… 

क्राउड फंडिंग वेबसाइट GoFundMeच्या माहितीनुसार इमानीच्या कुटुंबानं तिच्या प्रियकर जॉर्डनवर हत्येचे गंभीर आरोप केले आहेत. विनाकारण इमानीची हत्या करण्यात आल्याचे आरोप तिच्या कुटुंबीयांनी केले आहे. या प्रकरणी पोलिसांनी प्रथम श्रेणीत हत्या, द्वितीय श्रेणीत मुलाच्या भवितव्याला धोका पोहोचवण्याचे मनसुबे असे गंभीर आरोप जॉर्डनवर करण्यात आले. असंही सांगण्यात येत आहे की ही दिवंगत अभिनेत्री एका तीन वर्षीय मुलाची आई असून, जॉर्डनसोबतच्याच नात्यातून या मुलाचा जन्म झाला होता. मात्र याबाबत अधिकृत स्वरुपाती माहिती अद्यापही प्रतीक्षेत आहे.

admin
Author: admin

और पढ़ें