Search
Close this search box.

नव्या वर्षाआधीच मुंबईकरांना गिफ्ट; आजपासून 2 नवीन स्थानकं सुरू, लोकल प्रवास आरामदायी होणार!

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

 

 

हार्बर मार्गावरील लोकल प्रवास आता अधिक सुकर होणार आहे. रेल्वे प्रशासनाने दिलेले अश्वासन पूर्ण करत नवी मुंबईच्या प्रवाशांना दिलासा दिला आहे. बेलापूर/ नेरूळ-उरण मार्गावर सोमवारी म्हणजेच आजपासून आणखी 5 अतिरिक्त रेल्वे फेऱ्या सुरू करण्यात येणार आहेत. त्यामुळं या मार्गावरील एकूण गाड्यांची संख्या 40 वरुन 50 होणार आहे. तसंच, या मार्गावरील दोन स्टेशनही सुरू करण्यात येत आहे.

गेल्या काही दिवसांपासून उरण आणि बेलापूर या मार्गांवर लोकलची संख्या वाढवावी अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही पाठपुरावा करत रेल्वे मंत्र्यांकडे याबाबत मागणी केली होती. अखेर रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी विनंती मान्य करत लोकलची संख्या वाढवण्यास व दोन स्थानकांना मंजुरी दिली होती. त्यानंतर आज या दोन स्थानकांचे लोकार्पण होत आहे.

 

नवीन स्थानक सुरू होणार

हार्बर मार्गावर दोन नवीन रेल्वे स्थानकं सुरू होणार आहेत. त्यात तारघर आणि गव्हाण अशी दोन स्थानके आहेत. त्यातील तारघर हे महत्त्वाचं स्थानक असून नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या जवळच हे स्थानक आहे. त्यामुळं विमानतळ सुरू झाल्यानंतर या स्थानकावरील गर्दी वाढणार आहे. तसंच, मुंबईतून नवी मुंबईत येणाऱ्या प्रवाशांसाठीही हे स्थानक फारच उपयोगाचे ठरणार आहे. तारघर रेल्वे स्थानकासाठी 100 कोटींचा खर्च करण्यात आला आहे.

गव्हाणे

गव्हाण स्टेशन सुरू झाल्यामुळे स्थानिक प्रवाशांचा उपनगरीय रेल्वेचा प्रवास अधिक सोपा होईल.

वेळापत्रकात बदल

उरण मार्गावरील प्रवाशांना आता रात्री उशिरापर्यंत आता लोकल पकडता येणार आहे. मात्र नव्याने सुरू झालेल्या स्टेशन आणि नव्या लोकल गाड्यांमुळं वेळापत्रकात बदल होणार आहेत.

उरणहून: पहिली ट्रेन 05:35 ला, तर शेवटची ट्रेन रात्री 10:05 ला.

बेलापूरहून: पहिली ट्रेन 5.45 वाजता तर शेवटची ट्रेन रात्री 10:15 पर्यंत उपलब्ध असेल.

नेरूळहून पहिली लोकल 6.05 ते शेवटची लोकल 9.30 वाजता उपलब्ध असेल

admin
Author: admin

और पढ़ें