Search
Close this search box.

IndiGo नं मारलं Indian Railway नं तारलं; प्रवाशांना रेल्वेकडून विशेष मदत, कसा घ्याल लाभ?

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

मागील काही दिवसांपासून इंडिगोची हजारो उड्डाणं रद्द झाली आणि त्याचा थेट परिणाम लाखो विमान प्रवाशांवर झाल्याचं दिसून आलं. काही उड्डाणांच्या वेळा 10 ते 12 तासांनी पुढे गेल्या, तर काही विमानांचं उड्डाण रद्द करण्यात आलं. ज्यामुळं विमानतळांवर तोबा गर्दी पाहायला मिळाली. अनेक प्रवाशांना महत्त्वाच्या कार्यक्रमांना मुकावं लागलं आणि ही परिस्थिती, हे संकट गडद होत असतानाच भारतीय रेल्वे तारणहार होत या प्रवाशांच्या मदतीला धावून आली.

लाखोंच्या संख्येनं प्रवासी विमानतळावर ताटकळल्याचं पाहता रेल्वेनं तातडीनं निर्मय घेत त्यांना निर्धारित ठिकाणांवर पोहोचवण्यासाठी विशेष व्यवस्था करत विविध रेल्वेमार्गांवर जादा गाड्या सोडण्यास सुरुवात केली. शिवाय काही रेल्वेंना जास्तीचे AC डबेही जोडले.

 

विशेष रेल्वे कुठून कुठवर प्रवासाची मुभा देणार? 

भारतीय रेल्वेच्या निर्णयानुसार सेंट्रल, वेस्टर्न, नॉर्थ वेस्टर्न आणि ईस्टर्न रेल्वेनं शनिवारी मोठ्या संख्येनं जादा गाड्यांची सोय केली. यामध्ये पुणे- बंगळुरू, पुणे- दिल्ली, मुंबई- दिल्ली, मुंबई – गोवा, लखनऊ- मुंबई, नागपूर- मुंबई, गोरखपूर- मुंबई अशा मार्गांवर रेल्वेची व्यवस्था करण्यात आली. यामध्ये हावडा- नवी दिल्ली विशेष रेल्वे शनिवार, 6 डिसेंबर 2025 ला सायंकाळी धावणार असून, 8 डिसेंबरला ही रेल्वे परतीचा प्रवास करेल. तर, मुंबई- मडगाव एसी विशेष लोकल 7 डिसेंबर रोडी सोडण्यात येईल.

रेल्वेकडून फक्त जादा ट्रेनच नव्हे तर काही लांब पल्ल्याच्या रेल्वेंना जादा AC डबेसुद्धा जोडण्यात आले आहेत. यामध्ये बंगळुरू- अगरतळा हमसफर, मंगळुरू – तिरुवअनंतपूरम, बंगळुरू- चेन्नई, मुंबई- मंगळुरू अशा रेल्वेगाड्यांची आसनक्षमता पूर्ण झाल्याचं वृत्त आहे. तर, जम्मू आणि दिब्रूगढ राजधानी रेल्वेत 3AC कोच, चंदीगढ- अमृतसर शताब्दी ट्रेनमध्येही वाढीव डबे जोडण्यात आले आहेत.

किती वाढीव डब्यांची व्यवस्था? 

उपलब्ध माहितीनुसार रेल्वे विभागानं 37 रेल्वेंमध्ये 116 वाढीव डबे जोडण्यात आले. यामुळं 114 दौऱ्यांमध्ये साधारण 4.9 लाख अधिक प्रवाशांना प्रवास करता येणार आहे. या संपूर्ण परिस्थितीमध्ये भारतीय रेल्वे 35000 अधिक प्रवासी हाताळत असून, या आठवड्यात एकूण 26 लाख प्रवाशांना रेल्वेनं आधार दिल्याचं स्पष्ट होत आहे. हे संकट टळेपर्यंत रेल्वेकडून प्रवाशांसाठी या सुविधा दिल्या जातील असं रेल्वे विभागातील बड्या अधिकाऱ्यांनी सांगितल्यानं प्रवाशांसाठी हा मोठा दिलासा मिळत आहे.

admin
Author: admin

और पढ़ें