Search
Close this search box.

अखेर मोदींनी ‘तो’ निर्णय घेतलाच! 10 आणि 11 मे रोजी इंधन आवाहन केलं अन् आता…

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

देशात इंधन बचत, काटकसर आणि ऊर्जा वापर नियंत्रणाबाबत सातत्याने संदेश देणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता स्वतःच्या सुरक्षा ताफ्यातही मोठा बदल केल्याची माहिती समोर आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, पंतप्रधानांनी स्वतःच्या एसपीजी सुरक्षा ताफ्यातील गाड्यांची संख्या लक्षणीयरीत्या कमी करण्याचे निर्देश दिले आहेत.

देशांतर्गत दौऱ्यांमध्ये कमी वाहनांसह ताफा

विशेष म्हणजे, हा निर्णय केवळ कागदावर न राहता अंमलातही आणण्यात आला असून पंतप्रधानांच्या अलीकडील देशांतर्गत दौऱ्यांमध्ये कमी वाहनांसह ताफा दिसून आला. वडोदरा आणि गुवाहाटी दौऱ्यादरम्यान हा बदल प्रत्यक्षात लागू करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

राजकीय व प्रशासकीय वर्तुळात चर्चा
हैदराबादमधील भाषणात पंतप्रधान मोदी यांनी देशवासियांना तेलाचा वापर कमी करण्याचे, अनावश्यक खर्च टाळण्याचे आणि ऊर्जा बचतीकडे वळण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर लगेचच त्यांच्या सुरक्षा ताफ्यात कपात करण्यात आल्याने ‘नेतृत्व स्वतःपासून’ असा संदेश दिला जात असल्याची चर्चा राजकीय व प्रशासकीय वर्तुळात सुरू आहे.

प्रोटोकॉलमध्ये कोणतीही तडजोड नाही
सूत्रांच्या माहितीनुसार, एसपीजीच्या अनिवार्य सुरक्षा प्रोटोकॉलमध्ये कोणतीही तडजोड न करता ही कपात करण्यात आली आहे. आवश्यक सुरक्षा घटक कायम ठेवत अतिरिक्त वाहनांची संख्या कमी करण्यात आली आहे.

पंतप्रधानांच्या ताफ्यात कोणत्या गाड्या असतात?
पंतप्रधानांच्या ताफ्यात सामान्यतः सुरक्षा, कम्युनिकेशन, आपत्कालीन प्रतिसाद, वैद्यकीय सुविधा आणि प्रोटोकॉलशी संबंधित अनेक वाहनांचा समावेश असतो. मात्र बदललेल्या परिस्थितीत कमीत कमी संसाधनांत अधिक कार्यक्षम व्यवस्था ठेवण्याचा प्रयत्न केल्याचं सांगितलं जात आहे.

केंद्र सरकारकडून काटकसर आणि नियंत्रित खर्चाचे संकेत
देश आर्थिक आणि ऊर्जा संबंधित आव्हानांना सामोरे जात असताना केंद्र सरकारकडून काटकसर आणि नियंत्रित खर्चाचे संकेत सातत्याने दिले जात आहेत. सोन्या-चांदीवरील आयात शुल्क वाढ, इंधन बचतीचं आवाहन आणि आता पंतप्रधानांच्या ताफ्यातील कपात — या सर्व घडामोडींना व्यापक आर्थिक शिस्तीच्या संदेशाशी जोडून पाहिलं जात आहे.

विरोधकांकडून अद्याप प्रतिक्रिया नाही
दरम्यान, विरोधकांकडून या निर्णयावर अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नसली तरी राजकीय वर्तुळात या पावलाची मोठी चर्चा सुरू झाली आहे.

महाराष्ट्रातील 12 आमदारांनी परदेश दौरा रद्द केला असून प्रविण दरेकरांनी मोदींच्या आवाहनानुसार इलेक्ट्रीक कारमधून प्रवास सुरु केला आहे. सरकारी स्तरावर इंधन बचतीसाठी प्रयत्न सुरु झाल्याचं चित्र या निमित्ताने दिसून येत आहे.

admin
Author: admin

और पढ़ें

‘वंशावळ सिद्ध करा, नियमाप्रमाणे SEBC किंवा कुणबी एकच निवडावं लागेल, आज-उद्या प्रमाणपत्र द्या ते शक्य नाही, त्याची प्रोसेस आहे..’ मनोज जरांगेंच्या मागण्यांवर जालना जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले नियम

‘वंशावळ सिद्ध करा, नियमाप्रमाणे SEBC किंवा कुणबी एकच निवडावं लागेल, आज-उद्या प्रमाणपत्र द्या ते शक्य नाही, त्याची प्रोसेस आहे..’ मनोज जरांगेंच्या मागण्यांवर जालना जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले नियम