Search
Close this search box.

नेपाळच्या PMचा राजीनामा, हिंसक आंदोलनानंतर पायउतार; देश सोडण्याच्या तयारीत, तरुणांनी संसद पेटवली

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

सोशल मीडियावरील बॅनविरोधात नेपाळमधील तरुणाई रस्त्यावर उतरली आहे. या आंदोलनामुळे देशात सत्तांतर होण्याची चिन्हं आहेत. शेजारील देशात सुरु असलेल्या आंदोलनानं ओली सरकार संकटात सापडलं आहे. पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनीदेखील नुकताच राजीनामा दिला आहे. सरकारनं कालच सोशल मीडियावरील बंदी मागे घेण्याचा निर्णय घेतला. पण त्यानंतरही तरुणाईचा रोष कमी झालेला नाही. आंदोलनाची धग देशभरात जाणवू लागली आहे.

नेपाळचे पंतप्रधान ओली दुबईला पळून जाण्याच्या तयारीत आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वैद्यकीय उपचारांच्या बहाण्यानं ते दुबईला जाऊ शकतात. नेपाळमधील खासगी विमान कंपनी असलेल्या हिमालय एअरलाइन्सचं विमान स्टँडबायवर ठेवण्यात आलं आहे. पंतप्रधान ओली कधीही देश सोडू शकतात. सध्याच्या घडीला जेन झीचं आंदोलन निर्णायक टप्प्यावर आहे. या आंदोलनानं देशात क्रांती घडू शकते.

नेपाळमध्ये सुरु असलेलं तरुणाईचं आंदोलन अधिकाधिक तीव्र होत चाललं आहे. तरुणांनी संसदेत घुसून दोन्ही सदनांना आग लावली. सध्याच्या घडीला संपूर्ण संसद आंदोलकांच्या ताब्यात आहे. दुसरीकडे संपूर्ण देशात राजीनामांचा सिलसिला सुरु झाला आहे. आंदोलकांचा धसका घेत मधेश प्रदेशचे मुख्यमंत्री सतीश सिंह यांनी राजीनामा दिला आहे. यासोबतच लुंबिनी, गंडकी, सुदूर पश्चिम प्रदेशसह अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्‍यांनी राजीनामे दिले आहेत. राजधानी काठमांडूसह अनेक राज्यांमध्ये आंदोलनं सुरु आहेत. जाळपोळ, दगडफेक यांच्यामुळे प्रचंड आर्थिक नुकसान झालं आहे. हिंसाचाराच्या घटना वाढत असल्यानं राजकीय संकट निर्माण झालं आहे.

admin
Author: admin

और पढ़ें