Search
Close this search box.

Shahaji Bapu Patil : एकनाथ शिंदेंच्या ओएसडीच्या आमदारकीसाठी शहाजी बापू पाटलांची लॉबिंग; भाजपला दिली मोठी ऑफर

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

राज्यातील शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील (Mahayuti) जागावाटपावरून हालचालींना सुरु झाल्याचे पाहायला मिळत आहे. याच दरम्यान शिंदे गटाचे माजी आमदार शहाजी बापू पाटील (Shahaji Bapu Patil) यांनी शिक्षक मतदारसंघ शिवसेना शिंदे गटाकडे (Shiv Sena Shinde Group) देण्याची मागणी केली असून, पदवीधर मतदारसंघाची जागा भाजपकडे (BJP) देण्यात यावी, असं स्पष्ट मत शिक्षक मेळाव्यात मांडलं आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

या मागणीमागे मंगेश चिवटे यांना शिक्षक मतदारसंघातून उमेदवारी देण्याचा हेतू असल्याचं बोललं जात आहे. शहाजी बापू पाटील यांनी थेट नाव न घेता महायुतीकडे अप्रत्यक्षपणे मंगेश चिवटे यांच्यासाठी जागा सोडण्याचा आग्रह केला. “हा माणूस (मंगेश चिवटे) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या तिघांशीही जवळचा आहे, असे वक्तव्य शहाजी बापू पाटील यांनी केले आहे.

मंगेश चिवटे यांची तयारी सुरु
मंगेश चिवटे हे शिवसेना शिंदे गटातील तरुण नेते असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे निकटवर्तीय मानले जातात. मूळचे सोलापूर जिल्ह्यातील करमाळ्याचे असलेल्या मंगेश चिवटे यांनी पत्रकारितेतून मुंबईतील करिअरची सुरुवात केली होती. त्यानंतर, शिवसेना अखंड असताना शिवसेना वैद्यकीय कक्षाची स्थापन त्यांच्या पुढाकाराने झाली. तसेच, वैद्यकीय क्षेत्रात त्यांचं मोठं नाव असून मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या उभारणीची संकल्पना देखील त्यांनीच मांडली होती. सध्या ते उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे प्रमुख आहेत. गेल्या काही दिवसांपासून मंगेश चिवटे यांनी निवडणुकीसाठी जोरदार तयारी पाहायला मिळत आहे. त्यांनी नुकताच सोलापूरात ‘शिक्षक पुरस्कार सोहळा’ आयोजित केला होता. या कार्यक्रमाला ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे हे देखील उपस्थित राहिले होते.

महायुतीत जागावाटपावरून हालचाली गतिमान
दरम्यान, राज्यात लवकरच शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे महायुतीतील प्रत्येक पक्ष आपल्यासाठी सुरक्षित जागा मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यातच आता महायुतीत शिक्षक मतदार संघ आम्हाला द्या आणि पदवीधर मतदारसंघ भाजपकडे घ्या, अशी मागणी शहाजी बापू पाटील यांनी केली आहे. शहाजी बापू पाटील यांच्या मागणीवर भाजपमधून काय प्रतिक्रिया समोर येणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

admin
Author: admin

और पढ़ें