हरियाणामध्ये विधानसभा निवडणुकांची मतमोजणी आज 8 ऑक्टोबर रोजी होत आहे. सत्तारुढ भाजपा सत्ता कायम राखण्यास यशस्वी होणार की काँग्रेस 10 वर्षांनंतर पुन्हा सत्तेत येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार होतं. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आठ ऑक्टोबर रोजी सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीची सुरुवात झाली. यावेळी मतमोजणी केंद्रांवर मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पहिल्या एक तासांतच निवडणुकीचे कल स्पष्ट झाले असून काँग्रेसला बहुमत मिळाले आहे.









