Search
Close this search box.

Mumbai Local Mega Block: मुंबईकरांचा रविवारी खोळंबा! तिन्ही रेल्वेमार्गांवर मेगाब्लॉक; अनेक लोकल फेऱ्या रद्द, वेळापत्रकात मोठे बदल

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

मध्य रेल्वेने ठाणे ते कल्याण आणि सीएसएमटी ते चुनाभट्टी/ वांद्रेदरम्यान रविवारी मेगाब्लॉक घोषित केला आहे. पश्चिम रेल्वेवर चर्चगेट ते मुंबई सेंट्रलदरम्यान ब्लॉक घेण्यात येणार आहे. रेल्वे रुळांसह सिग्नलची देखभाल दुरुस्तीची कामे ब्लॉकमध्ये करण्यात येतात. यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द राहणार असून काही लोकल फेऱ्या विलंबाने धावणार आहेत.

मध्य रेल्वे
स्थानक – ठाणे ते कल्याण
मार्ग – अप आणि डाउन जलद
वेळ – सकाळी १०.४० ते दुपारी ३.१०
परिणाम – ब्लॉक वेळेत अप आणि डाउन जलद मार्गावरील लोकल फेऱ्या अप आणि डाउन धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत. यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द राहणार असून उर्वरित लोकल फेऱ्या सुमारे २० ते २५ मिनिटे विलंबाने धावणार आहेत.

हार्बर रेल्वे
स्थानक – सीएसएमटी ते चुनाभट्टी / वांद्रे
मार्ग – अप आणि डाउन
वेळ – सकाळी १०.४० ते दुपारी ४.४०
परिणाम – सीएसएमटी ते वाशी/ बेलापूर/पनवेल आणि सीएसएमटी ते गोरेगाव / वांद्रे दरम्यान धावणाऱ्या अप आणि डाउन लोकल फेऱ्या रद्द राहणार आहेत. पनवेल आणि कुर्लादरम्यान विशेष लोकल चालवण्यात येणार आहेत. ठाणे ते वाशी / नेरूळ दरम्यान आणि नेरूळ / बेलापूर ते उरण दरम्यान लोकल फेऱ्या वेळापत्रकानुसार उपलब्ध असणार आहेत.

पश्चिम रेल्वे
स्थानक – चर्चगेट ते मुंबई सेंट्रल
मार्ग – अप आणि डाउन धीमा
वेळ – सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५
परिणाम – ब्लॉकवेळेत अप आणि डाउन धीम्या मार्गावरील लोकल फेऱ्या अप आणि डाउन जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत. यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द राहणार असून काही लोकल फेऱ्या विलंबाने धावणार आहेत.

तिसऱ्या मार्गिकेसाठी रात्रीचा ब्लॉक
कसारा ते आसनगावदरम्यान तिसरी मार्गिका सुरू करणे आणि कसारा यार्डामधील मार्गिकांचे विस्तारीकरण या कामांसाठी मध्य रेल्वेने शनिवारी रात्रीनंतर विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घोषित केला आहे. खर्डी ते कसारादरम्यान अप मार्गावर शनिवारी रात्री ११.१० ते मध्यरात्रीनंतर १.४० पर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉकवेळेत कसारा आणि खर्डीदरम्यान लोकल उपलब्ध राहणार नाही. सीएसएमटी येथून शनिवारी रात्री ९.३२ वाजता सुटणारी कसारा लोकल आसनगावपर्यंत चालवण्यात येईल. सीएसएमटीतून रात्री १०.४७ वाजता सुटणारी लोकल ११.०३ वाजता सुटेल आणि खर्डी स्थानकात ३० मिनिटे थांबवण्यात येईल. ब्लॉकपूर्वी सीएसएमटीहून रात्री ८.४४ ला सुटणारी शेवटची कसारा लोकल असणार आहे. ब्लॉकनंतर सीएसएमटीहून सुटणारी ११.०५ ची कसारा ही पहिली लोकल असणार आहे. कसारा येथून मध्यरात्री ३.५१ ची सीएसएमटीसाठी पहिली लोकल असणार आहे. ब्लॉक वेळेत नऊ मेल-एक्स्प्रेस सुमारे २५ ते ३० मिनिटे विलंबाने धावणार आहेत.

admin
Author: admin

और पढ़ें