Search
Close this search box.

Mulund Labour Camp: लेबर कॅम्पमध्ये आगीचा भडका; आठ सिलिंडरचे लागोपाठ स्फोट; ३०० हून अधिक कामगार बचावले

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

मुलुंड पूर्वेतील नवघर रोड येथे मुंबई महापालिकेच्या प्रकल्पग्रस्तांसाठीच्या इमारतीच्या बांधकामालगत असलेल्या लेबर कॅम्पला गुरुवारी दुपारी भीषण आग लागली. आगीत पाच किलोचे सात आणि १४.२ किलोचा एक अशा आठ सिलिंडरचे एकापाठोपाठ स्फोट झाले. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाला सुमारे दोन तास लागले. प्रकल्पस्थळी काम करणारे ३००हून अधिक कामगार वेळीच दूर गेल्याने बचावले.

कामगारांसाठीचा लेबर कॅम्प

मुलुंड पूर्वेला मुंबई महापालिकेकडून प्रकल्पग्रस्तांसाठी इमारती उभारण्याचे काम सुरू आहे. या कामाची जबाबदारी शापूरजी पालोनजी कन्स्ट्रक्शन कंपनीकडे असून, प्रकल्पालगतच कामगारांसाठी लेबर कॅम्प उभारण्यात आला आहे. रात्री कामगार या कॅम्पमध्ये विश्रांती घेतात.

कॅम्पला अचानक आग

गुरुवारी दुपारी सुमारे दीडच्या सुमारास कॅम्पला अचानक आग लागली. काही वेळातच आग संपूर्ण कॅम्पमध्ये पसरली. त्यामुळे परिसरात आगीच्या उंच ज्वाळा आणि धुराचे लोट दिसून येत होते. आग लागल्याचे लक्षात येताच प्रकल्पाच्या आसपास काम करणाऱ्या कामगारांनी सुरक्षित ठिकाणी धाव घेतली.

आगीचा भडका

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाची आठ वाहने घटनास्थळी दाखल झाली. जवानांनी आग विझवण्याचे काम सुरू केले. कॅम्पमध्ये कामगारांचे सामानही ठेवण्यात आले होते. मेटल शीट, लाकूड आणि अन्य साहित्यापासून कॅम्प उभारण्यात आल्याने आगीने वेगाने भडका घेतला.

आग आटोक्यात आणण्यात आली

या आगीत पाच किलोचे सात आणि १४.२ किलोचा एक असे एकूण आठ सिलिंडर एकापाठोपाठ फुटले. त्यामुळे परिसर स्फोटांच्या आवाजाने दणाणून गेला. परिमंडळ सहाचे सहायक विभागीयअग्निशमन केंद्र अधिकारी डी. एम. पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमारे दोन तासांच्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणण्यात आली.

admin
Author: admin

और पढ़ें