Search
Close this search box.

राजकारणात मोठा भूंकप! अजून एका पक्षाला सर्वात मोठा धक्का, तीन बंडखोर आमदार करणार भाजपमध्ये प्रवेश

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

गेल्या काळात झालेल्या निवडणुकीत एनडीएला मोठं यश पाहिला मिळालं आहे. महाराष्ट्रसह पश्चिम बंगालमध्ये राजकीय भूकंपानंतर आता आणखीन एका पक्षाला निवडणुकीच्या काळात मोठा धक्का बसला आहे. महाराष्ट्रातील सर्वात मोठा पक्ष असलेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनाला भाजपने मोठा झटका दिला. त्यानंतर पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसमध्ये तर सर्वात मोठी फूट पडली.  तब्बल वीस खासदारांनी तृणमूलची साथ सोडत दुसऱ्या पक्षात प्रवेश करुन राजकारणात सर्वात मोठा भूकंप केला. शिवसेना आणि तृणमूल काँग्रेसनंतर आता  समाजवादी पक्षाला मोठा धक्का बसला आहे.

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा सर्वात मोठा राजकीय भूकंप मानला जातोय. समाजवादी पक्षाचे तीन बंडखोर आमदारांनी त्यांची साथ सोडली आहे. गौरीगंजचे राकेश प्रताप सिंह, अयोध्या (गोसाईगंज) येथील अभय सिंह आणि कालपी (जालौन) येथील विनोद चतुर्वेदी हे अधिकृतपणे भारतीय जनता पक्षात सहभागी होणार आहे. या तिन्ही नेत्यांनी २०२४ च्या राज्यसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराला मतदान केलं होतं.

14 ऑक्टोबर रोजी अमेठी जिल्ह्यातील गौरीगंज येथे एका मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमात या तीन नेत्यांचा भाजपमध्ये भव्य स्वागत करण्यात येणार आहे. हा भव्य पक्षप्रवेश सोहळा गौरीगंज इथल्या राकेश प्रताप सिंह यांच्या खाजगी निवासस्थानी पार पडणार आहे. या कार्यक्रमाला माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष पंकज चौधरी यांच्यासह पक्षाचे अनेक ज्येष्ठ नेते आणि मंत्री उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे कालपीचे आमदार विनोद चतुर्वेदी यांनी लखनऊमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतल्यामुळे सगळ्यांचे भुवया उंचावल्या होत्या. यावेळी गौरीगंजचे आमदार राकेश प्रताप सिंह आणि गोसाईगंजचे आमदार अभय सिंह हेदेखील उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांसोबतच्या त्यांच्या भेटीनंतर, त्यांच्या भाजपमध्ये एन्ट्री करतील अशी चर्चा रंगली होती.

राकेश प्रताप सिंह यांनी स्वतः सांगितलं की ते १४ ऑक्टोबर रोजी भाजपमध्ये सहभागी होणार आहे. आज ते यासंदर्भात पत्रकार परिषद घेणार आहेत. त्यांच्या पक्षप्रवेश कार्यक्रमाचा संपूर्ण तपशील या परिषदेत दिला जाण्याची शक्यता असून या कार्यक्रमाला कोण नेते उपस्थित राहणार आणि कार्यक्रमाचे आयोजन कसे केले जाईल, याबद्दल सांगण्याची शक्यता आहे.

राकेश प्रताप सिंह यांचे समाजवादी पक्षाशी दीर्घकाळापासून मतभेद होते, असं जगजाहीर होतं. २०२४ च्या राज्यसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराच्या बाजूने मतदान करणाऱ्या समाजवादी पक्षाच्या आमदारांमध्ये त्यांचे नाव आल्यानंतर हे प्रकर्षाने स्पष्ट झालं होतं. त्यानंतर, समाजवादी पक्षाने जून २०२५ मध्ये त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती.

राकेश प्रताप सिंह यांच्यासोबत अयोध्येतील गोसाईगंजचे आमदार अभय सिंह आणि रायबरेलीच्या उंचाहारचे आमदार मनोज पांडे यांनाही सपामधून काढून टाकण्यात आले. या नेत्यांना नंतर विधानसभेत अपक्ष सदस्य म्हणून मान्यता देण्यात आली. दरम्यान, विनोद चतुर्वेदी हे २०२४ च्या राज्यसभा निवडणुकीत भाजपच्या बाजूने मतदान करणाऱ्या सपाच्या आमदारांपैकी एक होते, परंतु त्यावेळी त्यांना सपामधून काढून टाकण्यात आले नव्हते.

admin
Author: admin

और पढ़ें