ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या मृत्यूप्रकरणी गोवा पोलिसांनी तपास सुरु केला आहे. विशेष म्हणजे या प्रकरणामध्ये या प्रकरणामध्ये बीएनएसएस कलम 194 अंतर्गत अनैसर्गिक मृत्यूची नोंद करण्यात आली आली आहे. नानांच्या मृत्यूसंदर्भात घातपाताचा संशय व्यक्त केला जात असल्याची चर्चा असतानाच गोवा पोलिसांनी हा तपास सुरु केला आहे.
रात्री अडीचला मेसेज
गोव्यातील डोना पावला परिसरामध्ये नाना पाटेकरांचा बंगला आहे. याच बंगल्यात ते वास्तव्यास होते. गुरुवारी पहाटेच्या सुमारास त्यांच्या छातीत दुखू लागल्यानंतर त्यांनी रात्री अडीच वाजता त्यांच्या एका मित्राला यासंदर्भात मेसेज केला होता. अस्वस्थ वाटत असून छातीत डाव्या बाजूला वेदना होत असल्याचं नानांनी कळवल्याचं सांगितलं जात आहे. हा मेसेज संबंधित व्यक्तीने उशीरा पाहिला आणि तो घरी पोहोचला तेव्हा नानांना श्वास घ्यायला त्रास होत होता आणि ते घामाघूम झालेले अशी माहिती समोर येत आहे. काही वृत्तांनुसार, नाना पाटेकर त्यांच्या राहत्या घरामध्ये बेशुद्धावस्थेत आढळून आल्याचं सांगितलं जात आहे.
कोणत्या अधिकाऱ्याकडे सोपवलाय तपास?
पहाटे साडेचार वाजता नानांना ताताडीने डोना पावला येथील निवासस्थानावरुन जवळच असलेल्या मणिपाल रुग्णालयात नेण्यात आलं. या ठिकाणी डॉक्टरांनी त्यांना वाचवण्याचा, सीपीआर देण्याचा जवळपास 45 मिनिटं प्रयत्न केला. मात्र पहाटे 5 वाजून 20 मिनिटांनी नानांना मृत घोषित करण्यात आलं. याच प्रकरणी आता पोलिसांनी तपास सुरु केला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन नाईक या प्रकरणाचा तपास करत आहेत. नाना पाटेकरांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट करण्यासाठी पंचनामा, शवविच्छेदन आणि संबंधितांचे जबाब नोंदवण्यात येणार आहेत. घातपाताचा संशय आढळल्यास पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल.
बीएनएसएस कलम 194 अंतर्गत गुन्ह्याचा अर्थ काय?
बीएनएसएस कलम 194 अंतर्गत पोलिसांना आत्महत्या, अपघाती किंवा संशयास्पद मृत्यूच्या पार्श्वभूमीवर तपास करणं बंधनकारक असतं. याबाबतीत चौकशी करुन अहवाल सादर करायचा असतो. एखाद्या व्यक्तीने आत्महत्या केली आहे का? एखाद्या व्यक्तीचा मृत्यू दुसऱ्या व्यक्तीने, प्राण्याने, यंत्राने किंवा अपघाताने झाला आहे? मृत्यू अशा परिस्थितीत झाला आहे की, दुसऱ्या व्यक्तीने गुन्हा केला असावा अशी शंका वाटत असल्यास या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला जातो.
कलम 194 अंतर्गत स्वतंत्र गुन्हा नोंदवला जात नाही. चौकशीतून खुनासारखा दखलपात्र गुन्हा उघड झाल्यास बीएनएसच्या संबंधित कलमांखाली नियमित एफआयआर आणि तपास सुरू होतो. ही प्रक्रिया केवळ मृत्यूचे स्पष्ट कारण नोंदवण्यासाठी आहे.








