Search
Close this search box.

S Sreesanth Father Dies : क्रिकेटपटू श्रीसंतचा खंदा आधार हरपला, वडिलांचे निधन, 89व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

माजी भारतीय क्रिकेटपटू एस. श्रीसंतच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. श्रीसंतचे वडील व्ही. शांताकुमारन नायर यांचे शुक्रवारी रात्री निधन झाले. ते 89 वर्षांचे होते. कुटुंबीयांच्या सूत्रांनी त्यांच्या निधनाची माहिती दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. शांताकुमारन नायर यांच्यावर लिसी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान शुक्रवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर श्रीसंतच्या कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे.

पार्थिव रुग्णालयातील शवगृहात 

माहितीनुसार, शांताकुमारन नायर यांचे पार्थिव सध्या रुग्णालयातील शवगृहात ठेवण्यात आले आहे. त्यांचे काही नातेवाईक सध्या परदेशात आहेत. ते भारतात परतल्यानंतर पार्थिव केरळमधील कोठामंगलम येथील त्यांच्या पैतृक निवासस्थानी नेण्यात येणार आहे. नायर यांच्या पार्थिवाचे रविवारी अंत्यदर्शन घेता येणार आहे. रविवारी सकाळी 10 वाजल्यापासून दुपारी 2 वाजेपर्यंत त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल. त्यानंतर सायंकाळी 4 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

LIC मध्ये प्रादेशिक व्यवस्थापक म्हणून बजावली जबाबदारी

व्ही. शांताकुमारन नायर यांनी भारतीय जीवन विमा महामंडळात (LIC) दीर्घकाळ सेवा बजावली. ते संस्थेत प्रादेशिक व्यवस्थापक पदावर कार्यरत होते. या पदावरून निवृत्त झाल्यानंतर ते आपल्या कुटुंबासह केरळमध्ये राहत होते. एस. श्रीसंतने भारतीय क्रिकेटमध्ये वेगवान गोलंदाज म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण केली. देशासाठी खेळताना त्याने अनेक महत्त्वाच्या सामन्यांमध्ये प्रभावी कामगिरी केली. श्रीसंतच्या क्रिकेट प्रवासात त्यांच्या कुटुंबाचा, विशेषतः वडिलांचा मोठा पाठिंबा राहिला.

श्रीसंत 2022 मध्ये क्रिकेटच्या सर्व प्रकारांतून निवृत्ती जाहीर केली. भारताकडून त्याने कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 क्रिकेटमध्ये प्रतिनिधित्व केले. त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत त्याने एकूण 27 कसोटी, 53 एकदिवसीय आणि 10 टी-20 सामने खेळल्याचे उपलब्ध माहितीत नमूद आहे. या सामन्यांमध्ये त्याने अनुक्रमे 87, 75 आणि 7 विकेट्स घेतल्या.

admin
Author: admin

और पढ़ें