Search
Close this search box.

Pune Rain : पुणे जिल्ह्यात मुसळधार! खडकवासलासह तीन धरणं भरली; मुठा नदीत विसर्ग सुरू, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

पुणे शहर आणि जिल्ह्यात गुरुवारी रात्रीपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे (Heavy rainfall) प्रमुख धरणांमधील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली आहे. खडकवासला, पानशेत आणि वरसगाव ही तीन प्रमुख धरणे १०० टक्के भरली असून, धरणांच्या पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी होत असल्याने मुठा आणि घोडनदी पात्रात पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आला आहे. प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना खबरदारीचा व सतर्कतेचा इशारा दिला आहे. (Three dams full)

Pune Rain :  धरणांमधील पाणीसाठा व विसर्गाची स्थिती

खडकवासला धरणातून टप्प्याटप्प्याने विसर्ग वाढवण्यात येत असून, धरणाचे ११ दरवाजे ३ फुटांनी उघडण्यात आले आहेत. सध्या ३५,००० क्युसेक्सने विसर्ग सुरू असून तो टप्प्याटप्प्याने वाढवून ४५,००० क्युसेक्स करण्यात येणार आहे. खडकवासला, पानशेत आणि वरसगाव धरणे १०० टक्के भरली आहेत, तर कमी पाणलोट क्षेत्र असलेले टेमघर धरण सध्या ८३ टक्के भरले आहे. पानशेत धरणाच्या सांडव्यावरूनही विसर्ग वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागात पावसाचा जोर वाढल्याने डिंभे धरणातून घोडनदी पात्रात ९,००० क्युसेक्स वेगाने विसर्ग सुरू आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास हा विसर्ग आणखी वाढवला जाण्याची शक्यता आहे.

Pune Rain :  नदीपात्रातील रस्ते पाण्याखाली जाण्याची शक्यता

मुठा नदीपात्रात ४५,००० क्युसेक्सने पाणी सोडण्यात येणार असल्याने नदीपात्रातील रस्ते, पूल आणि अनधिकृत बांधकामे पाण्याखाली जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका व जिल्हा प्रशासनाने नागरिकांना योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.

Pune Rain :  पुण्यातील भिडे पूल पाण्याखाली…

पुण्यातील भिडे पूल पाण्याखाली गेला आहे. खडकवासला धरणातून सत्तावीस हजार क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला आहे. पुण्याजवळील घाटमाथ्यावर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे खडकवासला धरणातील विसर्ग टप्प्याटप्प्याने वाढवला जात आहे आणि त्यामुळे नदीपात्रातले रस्ते बंद करण्यात आले आहेत. आत्ता सत्तावीस हजार क्युसेकने विसर्ग सुरू आहे, मात्र हाच विसर्ग वाढवून 37 हजार क्युसेक ़वर येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

 

admin
Author: admin

और पढ़ें