Search
Close this search box.

जगावर पुन्हा एक संकट! 336 संशयित रुग्ण अन् 88 मृत्यू, इबोला उद्रेक; कोविडसारखी परिस्थिती पुन्हा येणार?

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

जगावर कोविड नंतर आणखीन एक मोठं आरोग्य संकट येणार अशी परिस्थिती आली आहे. हा आजार म्हणजे इबोला  हा आजार. काँगो आणि शेजारील युगांडामधील इबोला रोगाचा ताजा उद्रेक आता जागतिक स्तरावर होत आहे.  या रोगाचा उद्रेक जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) लक्षात आला असून, त्याला आंतरराष्ट्रीय सार्वजनिक आरोग्य आणीबाणी म्हणून घोषित करण्यात आले आहे. डब्ल्यूएचओच्या या निर्णयामागे हा संदेश आहे की, हा उद्रेक जागतिक आरोग्याच्या दृष्टीने गंभीर असून यावर त्वरीत लक्ष देणे आवश्यक आहे.

 

336 संशयित रुग्ण आणि ८८ मृत्यूंची नोंद

शुक्रवारी, आफ्रिकेच्या सर्वोच्च सार्वजनिक आरोग्य संस्थेने काँगोच्या इतुरी प्रांतात नवीन इबोला केसेसची पुष्टी केली. शनिवारी पर्यंत, संस्थेने 336 संशयित रुग्ण आणि 88 मृत्यूंची नोंद केली होती. यामध्ये लक्षवेधी बाब म्हणजे, शेजारील युगांडामध्ये फक्त दोन केसेस नोंदली गेली आहेत, तर उर्वरित सर्व रुग्ण काँगोमधील आहेत.

कशामुळे झाला उद्रेक?

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, सध्याचा उद्रेक बुंदीबुग्यो विषाणूमुळे झाला आहे, जो इबोला रोगाचा एक दुर्मिळ प्रकार मानला जातो. हा विषाणू अत्यंत घातक असून, त्यावर कोणतेही मान्यताप्राप्त उपचार किंवा लस उपलब्ध नाही. त्यामुळे रुग्णांवर उपचार करणे आणि प्रादुर्भावाचा प्रसार रोखणे हे अत्यंत आव्हानात्मक ठरत आहे.

विषाणू दुर्बल?

इतिहास पाहता, काँगो आणि युगांडामध्ये आतापर्यंत २० पेक्षा अधिक इबोला साथीच्या केसेसची  नोंद झाली आहे. १९७६ मध्ये काँगोमध्ये इबोला रोगाचा पहिला प्रादुर्भाव झाल्यापासून, बुंदीबुग्यो विषाणूची नोंद होणे ही फक्त तिसरीच वेळ आहे. याचा अर्थ असा की, हा विषाणू दुर्बल असल्याने त्यावर सतत लक्ष ठेवणे अत्यावश्यक आहे.

कोविडसारखी परिस्थिती पुन्हा?

डब्ल्यूएचओच्या अधिकाऱ्यांच्या मते, सध्याचा इबोला उद्रेक कोविड-१९ सारख्या जागतिक महामारीच्या निकषांमध्ये बसत नाही, त्यामुळे आंतरराष्ट्रीय सीमा बंद करण्याचा सल्ला दिला गेलेला नाही. तथापि, या उद्रेकावर त्वरित लक्ष देणे, रुग्णांचे वेळीच निदान करणे, संसर्गजन्य नियंत्रणाच्या उपाययोजना राबवणे आणि स्थानिक आरोग्य यंत्रणांना सुसज्ज करणे अत्यंत गरजेचे आहे.

एकंदर पाहता, काँगो आणि युगांडामधील इबोला उद्रेक ही एक गंभीर सार्वजनिक आरोग्य समस्या आहे. जागतिक आरोग्य संघटनेने याची तातडीने दखल घेत आंतरराष्ट्रीय पातळीवर उपाययोजना करण्यासाठी जागा तयार केली आहे.

admin
Author: admin

और पढ़ें