Search
Close this search box.

LPG Price Hike: मोठी बातमी: पेट्रोल-डिझेलनंतर घरगुती गॅस सिलेंडरची किंमतही वाढणार?

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

देशातील पेट्रोलियम कंपन्यांनी शुक्रवारपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. पेट्रोल 3 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 3.11 रुपये प्रति लीटर इतके महागले आहे. या इंधन दरवाढीमुळे महागाई भडकण्याची शक्यता आहे. अशातच आता सर्वसामान्यांची चिंता वाढवणारी एक माहिती समोर आली आहे. त्यानुसनार पेट्रोल (Petrol Price) आणि डिझेलनंतर घरगुती गॅस सिलेंडरच्या (Gas Cylinder) किंमतीत वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यापूर्वी मार्च महिन्यात एलपीजीच्या दरात (LPG Rate) 60 रुपयांची वाढ करण्यात आली होती. त्यानंतर एलपीजीच्या किंमती स्थिर होत्या. मात्र, इराण-अमेरिका युद्धामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर नैसर्गिक वायू (Natural Gas) आणि कच्च्या तेलाचा तुटवडा निर्माण झाला आहे. परिणामी या दोन्ही गोष्टींच्या किंमती वाढल्या आहेत. याचा थेट परिणाम भारतातील पेट्रोल आणि डिझेलच्या दरावर (Diesel Price) झाला आहे. त्यामुळे एलपीजीही यापासून अलिप्त राहणार नाही, अशी शक्यता आहे. त्यामुळे आगामी काळात घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमती वाढण्याची दाट शक्यता जाणकारांकडून वर्तविली जात आहे.

मुंबईत सध्या घरगुती गॅस सिलेंडरची किंमत 912.50 इतकी आहे. तर व्यावसायिक वापराच्या गॅस सिलेंडरमध्ये अलीकडेच मोठी वाढ करण्यात आली होती. त्यामुळे मुंबईत सध्या कमर्शियल एलपीजी 3024 रुपयांना मिळत आहे. तर दिल्लीत घरगुती एलपीजीचा दर 913 रुपये इतका असून दिल्लीत व्यावसायिक वापराचा गॅस सिलेंडर 3071.50 रुपयांना मिळत आहे.

जाणकरांच्या अंदाजानुसार, येत्या काही दिवसांमध्ये घरगुती गॅस सिलेंडरची किंमत वाढू शकते. भारताकडून 55 टक्के एलपीजीची आयात केली जाते. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सध्या कच्च्या तेलाचा भाव प्रतिबॅरल 105 ते 120 डॉलर्सपर्यंत पोहोचला आहे. एलपीजी गॅस तयार करण्यासाठी वापरात येणाऱ्या प्रोपेन आणि ब्युटेनची आयातही महागली आहे. परिणामी येत्या काळात एलपीजीची किंमत वाढणे अपरिहार्य असल्याचे सांगितले जात आहे.

Petrol and Diesel price: पेट्रोल आणि डिझेलचा भाव किती रुपयांनी वाढला?
गुरुवारी मध्यरात्रीपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्याची घोषणा केली. एप्रिल 2022 नंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पहिल्यांदाच वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार पेट्रोल 3 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 3.11 रुपये प्रति लीटर इतके महागले आहे. या दरवाढीमुळे देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत (Mumbai News) पेट्रोलचा दर 106.54 रुपयांवर पोहोचला आहे. तर डिझेल तीन रुपयांनी महागल्यामुळे प्रतिलीटर 93 रुपयांवर जाऊन पोहोचले आहे.

admin
Author: admin

और पढ़ें