Search
Close this search box.

Vaibhav Sooryavanshi ची भारतीय संघात एंट्री, टीम इंडियासाठी करणार पदार्पण! बीसीसीआयकडून संघाची घोषणा

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

भारताच्या संघ आगामी मालिका श्रीलंकेमध्ये खेळणार आहे, श्रीलंकेमध्ये ट्रायसिरीजचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये भारतीय संघामध्ये सर्वात युवा खेळाडूला टीम ए मध्ये खेळण्याची संधी मिळाली आहे. आज बीसीसीआयने भारतीय संघाच्या सोशल मिडिया अकाउंटवर संघाची घोषणा केली आहे. यामध्ये टीम इंडियाचे कर्णधारपद हे तिलक वर्मा सांभाळताना दिसणार आहे. तर प्रियांश आर्याला देखील भारतीय संघामध्ये स्थान मिळाले आहे. त्याचबरोबर आयपीएल 2026 मध्ये आणि अंडर 19 संघामध्ये केलेल्या कामगिरीनंतर आता निवडकर्त्यांनी वैभव सूर्यवंशीला देखील भारतीय संघामध्ये जागा मिळाली आहे. श्रीलंका दौऱ्यावर भारतीय संघात कोणत्या खेळाडूंना स्थान मिळाले यासंदर्भात वाचा.

या खेळाडूंना मिळाले भारतीय संघात स्थान

भारतीय अ संघामध्ये अनेक युवा खेळाडूंना संधी मिळाली आहे, यामध्ये राजस्थान रॅायल्सचा कर्णधार रियान पराग याला देखील संघामध्ये उपकर्णधाराचे पद मिळाले आहे. त्याचबरोबर आयुष बडोनी आणि निशांत संधू यांना देखील भारतीय संघामध्ये जागा मिळाली आहे. एसआरएचचा फिरकी गोलंदाज हर्ष दुबे याला देखील भारतीय संघामध्ये खेळण्याची संधी मिळाली आहे. आगामी 2027 च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या दृष्टीने ही मालिका खेळाडूंसाठी महत्वाची असणार आहे. पंजाब किंग्जसाठी मागील काही सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करणारा सूर्यांश शेंडगे याला देखील संघात जागा मिळाली आहे.

विकेटकिपरमध्ये पंजाबच्या प्रभसिमरण सिंह याला तिकीट मिळाले आहे, तर कुमार कुशाग्र याला देखील संघामध्ये खेळण्याची संधी मिळू शकते. विप्रज निगम, यश ठाकूर यांना देखील संघात जागा मिळाली आहे. सीएसकेचा अंशुल कबोज आणि युशवीर सिंह त्याचबरोबर अर्शद खान यांना संघामध्ये जागा मिळाली आहे.

admin
Author: admin

और पढ़ें

दिल्लीच्या जंतर-मंतरवर धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी सीजेपी चांगलीच आक्रमक झाली आहे. यावेळी या परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आहे. आंदोलकांनी पोलिसांनी लावलेले बॅरेकेट्स तोडण्याचा प्रयत्न केला, यानंतर पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला. 20 जुलै रोजी जंतर-मंतरवर पोलिसांचा लाठीचार्ज सुरु असताना तिथे फूड डिलीव्हरी बॉय पोहचला. महाराष्ट्रातून जेवण ऑर्डर करण्यात आले होते. जेवण ऑर्डर करणाऱ्याचे नाव आणि जेवण पाठवण्याचे कारण जाणून सगळेच शॉक झाले.