Search
Close this search box.

लाडक्या बहि‍णींना मिळणार थेट 3000 रुपये? मे महिना ठरणार खास; 65 लाख अपात्र महिला योजनेतून बाहेर

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

राज्यातील लाडक्या बहिणी गेल्या कित्येक दिवसांपासून मार्च आणि एप्रिल महिन्यातील हप्ताची वाट बघत आहे. राज्यातील पात्र महिलांसाठी ही सर्वात मोठी अपडेट आहे. मे महिन्यात लाडक्या बहिणींना मोठा हप्ता मिळणार आहे. लाडक्या बहिणींना आता दोन्ही महिन्याचे हप्ते लवकरच मिळण्याची शक्यता आहे. सरकारने याबाबत अधिकृत घोषणा केलेली नसली तरीही सुत्रांकडून ही माहिती मिळाली आहे.

राज्याचे मुख्यमंत्री यांची लाडकी बहिण योजना ही यशस्वी ठरली. यामध्ये मुंबई सारख्या शहरांबरोबरच खेड्यापाड्यातील महिलांनी देखील या योजनेचा लाभ घेतला आहे. पात्र महिलांना दरमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत मिळतात. मात्र गेल्या दोन महिन्यांपासून महिलांना 3000 रुपये मिळणार नाहीत. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 2 महिन्यांची हप्ता मिळालेला नसून तारखी लवकरच जाहीर होणार आहे.

योजनेची घोषणा करताना, सरकारने अंदाजे 45000 कोटी रुपयांच्या वार्षिक खर्चाचा अंदाज वर्तवला होता. नंतर 2025 च्या अर्थसंकल्पात हा खर्च 36000 कोटी रुपयांपर्यंत कमी करण्यात आला आणि 2026 च्या अर्थसंकल्पातही तरतूद कमी करण्यात आली. पडताळणी आणि लाभार्थ्यांच्या संख्येत घट झाल्यामुळे सरकारने खर्चात कपात केली असल्याचे मानले जाते. सरकारी अधिकाऱ्यांच्या मते, पडताळणीतून वगळण्यात आलेल्या अंदाजे 65 लाख लाभार्थ्यांना दिलेली रक्कम वसूल करण्याची तयारी सुरू आहे. अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, जिथे शक्य असेल तिथे अपात्र व्यक्तींकडून पैसे वसूल केले जातील.

पडताळणी प्रक्रियेमुळे मार्च आणि एप्रिलचे हप्ते अद्याप वितरित करण्यात आलेले नाहीत. मंत्रालयातील काही अधिकाऱ्यांच्या मते, सरकार मे महिन्याच्या अखेरीस किंवा जूनमध्ये दोन किंवा तीन महिन्यांचे हप्ते एकाच वेळी वितरित करू शकते.

admin
Author: admin

और पढ़ें

दिल्लीच्या जंतर-मंतरवर धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी सीजेपी चांगलीच आक्रमक झाली आहे. यावेळी या परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आहे. आंदोलकांनी पोलिसांनी लावलेले बॅरेकेट्स तोडण्याचा प्रयत्न केला, यानंतर पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला. 20 जुलै रोजी जंतर-मंतरवर पोलिसांचा लाठीचार्ज सुरु असताना तिथे फूड डिलीव्हरी बॉय पोहचला. महाराष्ट्रातून जेवण ऑर्डर करण्यात आले होते. जेवण ऑर्डर करणाऱ्याचे नाव आणि जेवण पाठवण्याचे कारण जाणून सगळेच शॉक झाले.