Search
Close this search box.

Sunday Megablock : माटुंगा ते मुलुंड दरम्यान रविवारी मेगाब्लॉक, घराबाहेर पडण्यापूर्वी वेळापत्रक पाहाच

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

मध्य रेल्वेचा 10 मे रोजी रविवारी मेगाब्लॉक असणार आहे. हा मेगाब्लॉक जवळपास 4 ते 45 तासांचा असणार आहे. महत्त्वाचं म्हणजे हा मेगाब्लॉक प्रवाशांचे हाल करणार असल्याच दिसून येत आहे. मध्य रेल्वेच्या माटुंगा आणि मुलुंड दरम्यान तसेच ट्रान्स हार्बर मार्गावर ठाणे आणि वाशी स्थानकांदरम्यान मेगा ब्लॉक असणार आहे. कसा असेल मेगाब्लॉक, कोणत्या वेळेत प्रवास करणं टाळा.

ठाण्यापलीकडील जलद गाड्या मुलुंड स्थानकावर डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील. ठाणे येथून सकाळी 11.03 ते दुपारी 3.38 पर्यंत सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील गाड्या मुलुंड स्थानकावर अप धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. या गाड्या मुलुंड आणि माटुंगा स्थानकादरम्यान थांबणार आहेत. यामध्ये 15 मिनिटांची तफावत पाहायला मिळेल.

मध्य रेल्वेप्रमाणेच ट्रान्स हार्बर मार्गावरही मेगाब्लॉक असणार आहेत. अप आणि डाऊन ट्रान्स हार्बर लाईनवरील ठाणे आणि वाशी नेरुळ स्थानकांदरम्यान सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 पर्यंत हा ब्लॉक असणार आहे. या दरम्यान वाशी, नेरळ आणि ठाणे स्थानकांदरम्याव अप आणि डाऊन अशा सेवा रद्द केल्या जाणार आहेत.

पश्चिम रेल्वेचा शनिवारी 9 मे रोजी मेगाब्लॉक असमार आहे. बोरिवली आणि भाईंदर स्थानकांदरम्यान हा मेगाब्लॉक असणार आहे. 9 मे (शनिवार) आणि 10 मे (रविवार) च्या मध्यरात्री विशेष नाईट जम्बो ब्लॉक घेण्यात येईल.  रविवारी दिवसा पश्चिम रेल्वेवर कोणताही मोठा ब्लॉक नियोजित नाही. त्यामुळे पश्चिम रेल्वेला रविवारी मेगाब्लॉक नसेल.

admin
Author: admin

और पढ़ें